नवी दिल्ली - सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) सात टक्क्यांनी वाढवला आहे. केंद्राच्या ३० लाख कर्मचाऱ्यांना तसेच ५० लाख सेवानिवृत्तांना आता मूळ वेतनावर १०७ टक्के डीए मिळेल. ही वाढ एक जुलैपासून लागू होईल.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत डीएसाठी अतिरिक्त रक्कम जारी करण्यात मंजुरी देण्यात आली. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, ही वाढ सहाव्या सेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित सूत्रांनुसार असेल. त्यामुळे सरकारवर ७,६९१ कोटींचा अतिरिक्त भार पडेल. निवृत्तांना महागाई दिलासा (डीआर) म्हणून मिळणाऱ्या भत्त्यातील वाढीमुळे ५,१२७ कोटींचा भार पडेल.