आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cabinet Approves Raising Quota Of Subsidised LPG To 12 Cylinders

चार हजार कोटींची निवडणूक सबसिडी! 13 दिवसांत वाढले 12 सिलिंडर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने मध्यमवर्गीयांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. आज (गुरुवार) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घरगुती वापराच्या अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरची संख्या 9 वरुन 12 करण्यात आली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी 17 जानेवारी रोजी झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (एआयसीसी) बैठकीत पंतप्रधान मनमोहनसिंग यांना अनुदानित सिलिंडरची संख्या 12 करण्याची मागणी केली होती. त्यानंतर तेरा दिवसांमध्येच अनुदानित सिलिंडरची संख्या 12 करण्यात आली आहे.

एआयसीसीच्या बैठकीनंतर पेट्रोलियम मंत्री विरप्पा मोईली यांनी तत्काळ 12 सिलिंडर करण्याची घोषणा केली होती, आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेताल जाईल असे सांगितले होते. त्यामुळे या निर्णयाची औपचारिकात तेवढी बाकी होती. सध्या मिळत असलेले नऊ सिलिंडर कमी पडत असल्याचे एआयसीसीच्या बैठकीत राहुल गांधी म्हणाले होते. त्यांच्या मागणीमुळेच सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.

वर्षाला 12 सिलिंडरचा निर्णय जाहीर करण्यासोबतच पेट्रोलियम मंत्री विरप्पा मोईली यांनी, अनुदान ग्राहकांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यास तूर्त स्थगिती दिली आहे. आधार कार्ड बँके खात्याशी संलग्निकरण केलेल्या ग्राहकांच्या तक्रारी आल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे मोईली यांनी सांगितले आहे. अनुदान थेट बँक खात्यात (डीबीटीएल)जमा करण्याच्या योजनाच्या अनेक ठिकाणांहून तक्रारी आल्या आहेत. यामुळे या योजनेचा अभ्यास करुन त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. सध्या 18 राज्यातील 289 जिल्ह्यात राबवण्यात येत आहे.
वाढीव अनुदानित सिलिंडरमुळे पेट्रोलियम मंत्रालयावर सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांच्या सबसिडीचा बोजा पडण्याची शक्यता आहे. पण मंत्रालयाने त्यांच्याच काही निर्णयांवर योग्य अंमलबजावणी केली, तर हा बोजा कमी करता येऊ शकतो. तसेच अतिरिक्त सबसिडी न देताही ग्राहकांना वर्षात 12 सिलिंडर दिले जाऊ शकतात.

पुढील स्लाइडमध्ये, 1700 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा