आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cabinet Clears Annuity Based PPP Model Wastewater Sector Under Namami Gange Plan

‘नमामि गंगे’ प्रकल्पातील शुद्धीकरणाचा लाभ रेल्वेला; पीपीपीला मंजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्राच्या नमामि गंगे योजनेअंतर्गत खासगी आणि सरकारी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. त्यानुसार शुद्ध करण्यात आलेल्या पाण्याची खरेदी रेल्वे विभाग करणार आहे.

हा विशेष प्रकल्प आहे. त्यासाठी सरकारने यंत्रणेचे स्वरूप, नियामक मंडळ, बाजारपेठ इत्यादी सर्व मुद्द्यांचा विचार करून त्याची उभारणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. गंगा नदीच्या पाण्यावर ही प्रक्रिया केली जाणार आहे. कंपनी कायद्यानुसार हे प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. रेल्वेसोबत सहमती करार केले जातील. जलस्रोत मंत्रालयाने अगोदरच रेल्वेशी करार केला आहे. त्यानुसार रेल्वे अशा प्रकल्पातील शुद्धीकरण केलेले पाणी खरेदी करेल. रेल्वेप्रमाणेच ऊर्जा, पेट्रोलियम आणि उद्योग मंत्रालयाशीदेखील काही करार होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सांडपाण्याच्या क्षेत्राला प्रोत्साहन
मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे देशातील सांडपाण्याच्या क्षेत्रातील सुधारणेला प्रोत्साहन मिळणार आहे. या क्षेत्रातील उद्योगाला गती मिळणार आहे. नमामि गंगे कार्यक्रमांतर्गत सुरू होणाऱ्या उद्योगाप्रमाणेच इतर खासगी प्रकल्प सुरू करण्यासाठी हा निर्णय प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास सरकारला वाटतो.