आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरचा व्यवसाय असेल, तर 14 वर्षांखालील मुलांनाही करता येणार काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जर घरचा आणि बिगरधोकादायक व्यवसाय असेल तर 14 वर्षांखालील मुलांनी त्यात काम केल्यास ती बात मजुरी ठरणार नाही. केंद्रीय मंत्रालयाने बुधवारी बालमजुरी कायद्यातील दुरुस्तीला मंजुरी दिली आहे. संसदेत हे बिल पास झाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. बाल मजुरी कायद्यात 18 धोकादायक उद्योगांमध्ये 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांकडून काम करून घेतल्यास तो बालमजुरी कायद्यांतर्गत गुन्हा मानला जातो. पण दुरुस्तीच्या मसुद्यात एक मोठा बदल करण्यात आलाय. तो म्हणजे घरच्या व्यवसायाबरोबरच एंटरटेनमेन्ट इंडस्ट्री आणि स्पोर्टस् अॅक्टीव्हिटी वगळता इतर सर्व क्षेत्रांत बालमजुरी हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. तर धोकादायक उद्योगांमद्ये 14 ते 18 वर्ष वयाच्या किशोरवयीनांच्या काम करण्यावरही बंदी लावण्यात आली आहे.

2012 पासून प्रलंबित बिल
बाल मजुरी विरोधातील हे बिल 2012 पासून प्रलंबित आहे. हा मूळ कायदा 1986 मध्ये तयार करण्यात आला होता. या 29 वर्षे जुन्या कायद्यानंतरच 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मजुरी करायला लावणे हा गुन्हा ठरवण्यात येत होता. नव्या विधेयकानंतर मात्र घरचा व्यवसाय असलेल्या मुलांना या चौकटीबाहेर ठेवण्यात आले आहे. अशी मुले घरच्या व्यवसायात मदत करू शकतील.

संशोधित मसुद्यात या व्यवसायांचा समावेश
संशोधित बिलाच्या मसुद्यात 14 वर्षांपेक्षा कमी मुलांना खालील व्यवसायात काम करण्याची सूट असेल.
- आॅडियो-व्हिज्युअल एटरटेनमेंट इंडस्ट्रीत (कलाकार असेल तर)
- जाहिराती, चित्रपट, टिव्हीवरील मालिकांत लहान भूमिका.
- सर्कस वगळता इतर स्पोर्टस् अॅक्टिव्हीटी
(मात्र यात पालकांना मुलांचे शिक्षण व्यवस्थित सुरू राहील, त्याच अडचणी येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल)

शिक्षाही वाढणार
जुन्या कायद्यामध्ये बाजमजूर नियुक्त करणाऱ्याला किमान 3 महीने आणि जास्तीत जास्त 1 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद होती. पण नव्या प्रस्तावित संशोधनानुसार आता या प्रकरणात दोषी आढळल्यास किमान 6 महिने आणि जास्तीत जास्त 2 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असेल. तसेच 50 हजार रुपए दंडही द्यावे लागेल. पालकांवर मात्र कोणताही दंड लागणार नाही. मात्र दुस-यांदा हे प्रकरण समोर आले तर पालकांवरही 10 हजारांचा दंड लागेल.