आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cabinet Clears Ordinance To Implement Food Security Bill

अन्नसुरक्षा अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, 81 कोटी जनतेला मिळणार लाभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अन्न सुरक्षा योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे देशातील 81 कोटी जनतेला दर महिन्याला पाच किलो अन्नधान्य सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे.

मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत अन्न सुरक्षा योजनेच्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे देशातील दोन तृतीयंश जनतेला तांदूळ ३ आणि गहू २ रुपये किलो दराने मिळणार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकार 1 लाख 25 हजार कोटी रुपयांचा निधी देणार आहे. ही जागतिक पातळीवरील सर्वात मोठी योजना ठरणार आहे.

पुढील आठवड्यापासून सुरू होणा-या पावसाळी अधिवेशानात संसदेच्या दोन्ही सभागृहात अन्न सुरक्षा विधेयक ठेवले जाणार आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत ही योजना लागू केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर सहा महिन्यात ही योजना देशभर लागू केली जाईल.