आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेश प्रभूंनी शिवसेना सोडली भाजपकडून रेल्वेमंत्रीपदाची जबाबदारी, पर्रिकरांना संरक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सत्तारोहणाच्या पाच महिन्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने रविवारी आपला पहिला मंत्रिमंडळ विस्तार केला. रात्री ११ च्या सुमारास खातेवाटपही जाहीर झाले. महाराष्ट्रातून सुरेश प्रभूंना कॅबिनेट, तर हंसराज अहिर यांना राज्यमंत्रिपद मिळाले. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे संरक्षण मंत्रालय सोपवण्यात आले. हर्षवर्धन यांचेही आरोग्य खाते बदलले आहे.
राष्ट्रपती भवनात दुपारी दीड वाजता झालेल्या शपथविधी समारंभात मनोहर पर्रीकर, सुरेश प्रभू, जे.पी. नड्डा व चौधरी वीरेंद्र सिंह यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय ३ स्वतंत्र प्रभार व १४ राज्यमंत्र्यांसह एकूण २१ नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. मंत्रिमंडळ सदस्यांची संख्या आता ६६ वर पोहोचली आहे. त्यात पंतप्रधानांसह २७ कॅबिनेट, १३ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री व २६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
नवे मंत्री खालील प्रमाणे
सुरेश प्रभू - रेल्वेमंत्री
मनोहर पर्रीकर - संरक्षण
जे.पी. नड्डा - आरोग्य
चौधरी वीरेंद्र सिंह - ग्रामविकास
३ राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार
राजीव प्रताप रुडी : कौशल्य संसदीय कामकाज
बंडारू दत्तात्रेय : कामगार व रोजगार
डॉ. महेश शर्मा : संस्कृती, पर्यटन तसेच नागरी उड्डयन.

फेरबदल
हर्षवर्धन : विज्ञान-तंत्रज्ञान (अाधी आरोग्य)
सदानंद गौडा : कायदा व न्याय (अाधी रेल्वे)
रविशंकर प्रसाद : दूरसंचार व आयटी कायम (कायदा मंत्रालय काढले)
अरुण जेटली : अर्थ, माहिती व प्रसारण (संरक्षण खाते काढले)
१४ राज्यमंत्री
रामकृपाल यादव : जल व स्वच्छता
विजय सांपला : सामाजिक न्याय व सशक्तीकरण
मुख्तार अब्बास नक्वी : अल्पसंख्याक व संसदीय कामकाज
हरिभाई चौधरी : गृह
सांवरलाल जाट : जल संधारण, नदी विकास, व गंगा पुनरुत्थान
मोहनभाई कुंदरिया : कृषी
गिरिराज सिंह : सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग
हंसराज अहिर : रसायन व खत
रामशंकर कठेरिया : मनुष्यबळ विकास
वाय.एस. चौधरी : विज्ञान तंत्रज्ञान
जयंत सिन्हा : अर्थ राज्यमंत्री
राज्यवर्धन सिंह राठोड : माहिती व प्रसारण
बाबुल सुप्रियो : नगरविकास, गृहनिर्माण, दारिद्र्य निर्मूलन
साध्वी निरंजन ज्योती : अन्न प्रक्रिया उद्योग.
पुढील स्लाइडवर वाचा, मंत्रिमंडळ वाटपाबाबतचे विश्लेषण...