आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'डीए\'त्रयोदशी: महागाई भत्ता १२५ वरून १२७%, केंद्राच्या ५० लाख कर्मचारांना मिळणार लाभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना सरकारने दिवाळीच्या आधी महागाई भत्ता वाढीची भेट दिली आहे. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात २% वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ १ जुलै २०१६ पासून लागू असेल. ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ५८ लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे. गुरुवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
- आजच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अजेंड्यावर महागाई भत्ता वाढीचा विषय होता. त्याला मंजूरी देण्यात आली आहे.

- या वर्षाच्या सुरुवातीला डीएमध्ये ६% वाढ करण्यात आली होती. तेव्हा तो बेसिक सॅलरीच्या १२५% झाला होता. आता दोन टक्के वाढीने महागाई भत्ता १२७% झाला आहे.
- त्यानंतर सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या. तेव्हा त्याचा मुळ वेतनात समावेश करण्यात आला होता.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...