नवी दिल्ली- केंद्र सरकारने कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्क्यांची वाढ केल आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा कर्मचार्याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) 113 वरून 119 टक्के करण्यात आला आहे. सरकाच्या या निर्णयाचा सुमारे 48 लाख सरकारी कर्मचारी व 55 लाख सेवानिवृत्त कर्मचार्यांना लाभ होणार आहे.