आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cabinet Recommends President Rule In Arunachal Pradesh

अरुणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट, राज्यपाला भाजपचे एजंट असल्याचा काँग्रेसचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री नबाम तुकी ( फाइल फोटो) - Divya Marathi
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री नबाम तुकी ( फाइल फोटो)
नवी दिल्ली - मोदी सरकारच्या शिफारसीवर अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यापूर्वी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली होती. सरकारच्या या निर्णयाचा काँग्रेस आणि आपने जोरदार विरोध केला आहे. काँग्रेसने याविरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेटही घेणार आहे. तर मुख्यमंत्री नबाम तुकी आज सोनिया आणि राहुल गांधींना भेटतील.

राष्ट्रपती राजवट लागू होण्यामागचे कारण...
- अरुणाचल प्रदेशात गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय हालचाली सुरू आहेत. काँग्रेस सरकारमधील 42 पैकी 21 आमदारांनी बंडखोरी केली आहे.
- 16-17 डिसेंबरला मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या काही आमदारांनी भाजपच्या मदतीने विश्वासमताचा प्रस्ताव सादर केला. त्यात सरकारचा पराभव झाला.
- सुत्रांच्या मते काँग्रेस सरकारला सत्ता हातची जाऊ द्यायची नव्हती, त्यामुळे त्यांनी सर्व दिशेने प्रत्न केले.

राजकारण्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
- काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी सरकारचा निर्णय हा राजकीय असहिष्णुतेचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. सिब्बल यांनी याविरोधात कोर्टात धाव घेणार असल्याचे म्हटले आहे.
- कांग्रेस नेते नारायण सामी म्हणाले की, राजभवन हे भाजपचे मुख्यालय बनले आहे आणि राज्यपाल भाजपच्या एजंटप्रमाणे काम करत आहेत.
- केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. अरुणाचल प्रदेशात राजकीय वातावरण बिघडले आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना अनेक दिवसांपासून त्रासाला सामोरे जावे लागत होते, असे ते म्हणाले.
- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा प्रकार घटनेची हत्या असल्याचे म्हटले आहे. भाजप पराभवानंतर मागच्या दाराने सत्ता मिळवण्याचा प्रय्तन करत असल्याचे ते म्हणाले.

असंतुष्ट कालिखो यांची मुख्यमंत्रिपदी निवड
बंडखोर काँग्रेस अामदार व उपाध्यक्ष टी. नोरबू थोंगडोक यांनी भाजप व अपक्ष आमदारांनी आणलेला सरकारविरोधी अविश्वास प्रस्ताव स्वीकारला. ६० सदस्यांच्या विधानसभेत २० असंतुष्ट काँग्रेस आमदारांसह ३३ सदस्यांनी अन्य असंतुष्ट काँग्रेस आमदार कालिखो पूल यांची नव्या मुख्यमंत्रिपदी निवड केली. मुख्यमंत्री नबम तुकी आणि त्यांच्या २६ समर्थकांनी कामकाजावर बहिष्कार टाकून ते बेकायदा ठरवले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS