आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केंद्रीय कॅबिनेटची महागाई भत्तावाढीला मंजूरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय कर्मचारी व पेन्शनर्सचा महागाई भत्ता (डीए) एक टक्क्याने वाढला आहे. आता तो ५ टक्क्यांवर जाईल. १ जुलैपासून लागू होणाऱ्या या वाढीचा केंद्राच्या ४९.२६ लाख कर्मचारी व ६१.१७ लाख पेन्शनर्सला फायदा मिळेल. दुसरीकडे, पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी (दुरुस्ती) विधेयक, २०१७ संसदेत सादर करण्यास मंजुरी देण्यात आली. यातून सरकार ग्रॅच्युइटीवरील कर सूट दुप्पट करू इच्छिते. मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यासोबत बीएसएनएलच्या मोबाइल टॉवर उद्योगाला वेगळे करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनीला तोट्यातून बाहेर येण्यास मदत होणार आहे. 
 
किती कर्मचाऱ्यांना होणार फायदा
- डीएमध्ये 1% वाढीचा निर्णय झाला असून ही वाढ 1 जुलैपासून लागू केली गेली आहे. यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनरचा डीए 4 वरुन 5% झाला आहे. या निर्णयाचा लाभ केंद्र सरकारचे 49.26 लाख कर्मचारी आणि 61.17 लाख पेन्शनर्सला मिळणार आहे.  
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये डीए वाढीला मंजूरी देण्यात आली. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक 3,068.26 कोटी रुपये भार वाढणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...