आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केबलचालक घरपोच देणार "ऑन डिमांड ब्रॉडबँड'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आपल्या जवळ असलेला केबलचालक लवकरच आपल्या घरी "ऑन डिमांड' ब्रॉडब्रँड पोहोचवणार आहे. योजना कार्यान्वित झाल्यास स्पीड ब्रॉडबँड मासिक २००-३०० रुपये दराने २४ तास उपलब्ध होऊ शकेल.

यासाठी जगातील साधारण अर्धा डझन कंपन्यांनी दूरसंचार मंत्रालयाशी प्राथमिक चर्चा केली आहे. या कंपन्या सरकारकडून परवाने घेतील आणि केबलचालक त्यांच्या डिस्ट्रिब्यूटर-डीलरप्रमाणे ग्राहकांच्या घरी ब्रॉडबँड पोहोचवण्याचे काम करतील. वास्तवात नॅशनल ऑप्टिकल फायबर योजनेच्या माध्यमातून याच पद्धतीने देशातील ग्रामपंचायत अर्थात छोट्या गावांपर्यंत ब्रॉडबँडचे जाळे पोहोचवण्याची दूरसंचार मंत्रालयाची इच्छा आहे. या परिस्थितीत मंत्रालय खासगी कंपन्यांनाही या सेवेची संधी देऊ इच्छिते. यामुळे त्यांच्यावरील आर्थिक ताण कमी होऊ शकेल. यामुळे सरकारी दूरसंचार कंपन्या एमटीएनएल-बीएसएनएल यांच्यावर स्पर्धकांचा दबाव वाढेल.