आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CAG Arise Question On Augusta Westland Helicoptor Agreement

ऑगस्टावेस्टलॅँड हेलिकॉप्टर करारावर कॅगचे प्रश्नचिन्ह, सुनावणी भारतातच घेण्‍याची शिफारस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ऑगस्टावेस्टलॅँड हेलिकॉप्टर करारावर नियंत्रक व महालेखापाल (कॅग) यांनी आपल्या अहवालात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यामध्ये प्रकरणाची सुनावणी देशाबाहेर करण्याच्या शिफारशीचाही समावेश आहे. मात्र, संरक्षण मंत्रालयाने अशी शिफारस दोनदा फेटाळली आहे.


अतिविशिष्ट व्यक्तींसाठी 12 हेलिकॉप्टर खरेदीच्या 3,548 कोटी रुपयांच्या व्यवहारावर माजी कॅग विनोद राय यांच्या कार्यकाळात अहवाल तयार करण्यात आला. शशिकांत शर्मा यांनी कॅगचा पदभार स्वीकारण्याच्या एक महिना अगोदर अहवाल सादर करण्यात आला. यानंतर जारी अहवालात दोन हेलिकॉप्टर कंपन्या, अमेरिकेची सिकोरस्काई व ब्रिटिश-इटालियन ऑगस्टालॅँड कंपनीशी या प्रकरणाची सुनावणी देशाबाहेर करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुनावणी भारतातच केली जावी, असे कॅगचे म्हणणे आहे. संरक्षण मंत्रालयाने दोन शिफारशी फेटाळल्या आहेत. तत्कालीन संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखालील डिफेन्स प्रिक्योरमेंट बोर्डानेही परदेशातील सुनावणी करण्याची हवाई दलाची शिफारस फेटाळली होती.