आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘काॅल ड्रॉप’चा जाच लवकरच थांबणार, अाॅपरेटर कंपन्यांना कारवाईचा सामना करावा लागणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘काॅल ड्रॉप’च्या वाढत्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी दूरसंचार नियामक मंडळ ट्राय लवकरच ग्राहकांना उत्कृष्ट सेवा मिळावी यासाठी नवीन नियम ठरवणार अाहे. या नियमांचे पालन न केल्यास माेबाइल अाॅपरेटर कंपन्यांना माेठ्या कारवाईचा सामना करावा लागू शकताे. ट्रायचे अध्यक्ष राहुल खुल्लर यांनी ही माहिती दिली. नवीन नियम ठरवण्यासाठी काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या नियमांची घाेषणा महिनाभरात हाेऊ शकते. उद्याेग संस्था असाेचेमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बाेलत हाेते. विशेष म्हणजे सध्या माेबाइल ग्राहकांना काॅल न लागणे तसेच काॅल कट हाेण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले अाहेत. अनेक खासदारांनी हा मुद्दा दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासमोर मांडला. दूरसंचार सचिव राकेश गर्ग यांनीही साेमवारी माेबाइल अाॅपरेटर कंपन्यांना ग्राहकांच्या तक्रारी लवकर मार्गी लावा तसेच नेटवर्कमध्ये सुधारणा करा, असे सुनावले हाेते. दरम्यान, खुल्लर म्हणाले की, अार्थिक समावेशनासाठी फक्त बँक खाते काढणे अावश्यक नाही, तर बँकिंग व्यवस्थेच्या वापरासाठी लाेकांमध्ये विश्वास निर्माण करणेही अावश्यक अाहे.

अाताचे नियम असे
ट्रायने केलेल्या सेवा गुणवत्तेच्या अनेक नियमांमध्ये काॅल ड्रॉप, बिलिंग, तक्रार निवारणासाठी नियम अाहेत.
सध्या ट्राय माेबाइल अाॅपरेटर कंपन्यांच्या सेवेचा दर्जा १० गाेष्टींच्या अाधारे ठरवण्यात येताे.
या दहा नियमांमधील काेणत्याही एका बाबतीत खाेटी माहिती िदल्यास १० लाखांपर्यंतचा दंड करण्यात येताे.
पहिल्यांदा नियमांचे पालन न केल्यास ५० हजार दंड करण्यात येताे. त्यानंतर नियमांचे पालन केले नाही, तर एक लाख रुपये दंड ठोठावण्यात येताे.
ग्राहकांच्या तक्रारी
ग्राहकांनी वापरलेल्या डाटाची नेमकी माहिती िदली जात नसल्याच्या तक्रारी ट्रायला प्राप्त झाल्या अाहेत. बरेचदा ग्राहकांना जास्तीचे बिल दिले जाते. याबाबत अनेक ग्राहकांनी ट्रायकडे तक्रारी केल्या हाेत्या.