आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियामध्ये श्रीगणेशाच्या वादग्रस्त अॅडवरील बंदी फेटाळली, ASBची कंपनीला क्लीन चीट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाहिरातीमधील गणपती. - Divya Marathi
जाहिरातीमधील गणपती.
मेलबर्न/नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियामध्ये श्रीगणेशाच्या एका वादग्रस्त जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी फेटाळण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये लँब रोस्टच्या एका जाहिरातीमध्ये श्रीगणेशाचा फोटो वापरण्यात आला होता. याला येथील हिंदू संघटनांनी कडाडून विरोध करत या जाहिरातीवर बंदीची मागणी केली होती. गणपतीसह या जाहिरातीमध्ये पैगंबर दाखवण्यात आले आहे. अॅडव्हर्टायजिंग स्टॅंडडर्स ब्यूरोने (ASB) ही मागणी सपशेल फेटाळली आहे. त्यांचे म्हणणे आहे की जाहिरातीमध्ये काहीही आक्षेपार्ह नाही. 
 
Q&A मध्ये समजून घ्या संपूर्ण प्रकरण 
 
Q. काय आहे जाहिरातीमध्ये?
A
- 'मीट अँड लाइव्हस्टॉक ऑस्ट्रेलिया'ने 4 सप्टेंबर रोजी एक जाहिरात प्रसिद्ध केली. ही जाहिरात मेंढी किंवा कोकराचे मटण प्रमोट करण्यासाठी करण्यात आली होती.  
 
Q. जाहिरातीमध्ये श्रीगणेशाशिवाय आणखी कोणत्या देवता?
A
- मटणाच्या या जाहिरातीमध्ये गणपतीसह जीजस, बुद्ध, ज्यूस यांना दाखवण्यात आले आहे. हे सर्व डायनिंग टेबलवर बसलेले आहेत. या सर्वांना जाहिरातीमध्ये दाखवण्याचा उद्देश हा आहे की हे मटण सर्व एकत्र बसून खाऊ शकतात.  जाहिरातीची टॅग लाइनच आहे की 'द मीट-वी कॅन ऑल इट.'
   
Q. जाहिरातीला आक्षेप कोणाचा ? 
A
- मटणाच्या या जाहिरातीला हिंदू संघटनेने विरोध केला आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या एका भारतीय समुदायाचे प्रवक्ते नितीन वशिष्ठ म्हणाले - अशा प्रकारच्या जाहिरातींमुळे आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. आम्ही या जाहिरातीचा निषेध करतो. सोशल मीडियावरही लोकांनी या जाहिरातीचा निषेध केला आहे. 
 
Q. कंपनीने तपास संस्थेला काय सांगितले? 
A
- जाहिरातीवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आणि तपास संस्थांकडून विचारणा झाल्यानंतर MIL ने स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, 'या जाहिरातीच्या माध्यमातून आम्ही धार्मिक वैविध्य दाखवले आहे. विविध धर्मांची वेगवेगळी मते असू शकतात, मात्र डायनिंग टेबलवर या विविध विचारसरणींचे लँब मीटबद्दल एकमत होईल असा आम्हाला विश्वास आहे.' जाहिरातीमध्ये कोणाचाही अपमान होईल, किंवा पक्षपात केलेला नाही. विनोदी ढंगाने ही जाहिरात करण्यात आली आहे. 
 
Q. हिंदू मान्यता आणि श्रीगणेशाच्या वापरावर कंपनीचे मत?
A
- MIL ने  म्हटले आहे की हिंदू धर्मात मीट बंदी असल्याचे कुठेही म्हटलेले नाही. मात्र हिंदू धर्म परंपरेनुसार बीफ (गायीचे मांस) खाल्ले जात नाही. मात्र त्याचवेळी लॅम्बवर (बोकड-कोकरु यांचे मांस) कोणतीही बंदी नाही.  दुसरे असे की आम्ही हेही सांगू इच्छितो की जाहिरातीमध्ये गणपतीला मांस खाताना किंवा मद्यपान करताना दाखवलेले नाही. विशेष म्हणजे जाहिरातीमध्ये श्रीगणेशाच्या वेशात असलेली व्यक्ती ही हिंदू आहे. 
 
Q. तपास संस्थेने काय म्हटले?  
A
- जाहिरातीवर आक्षेप घेतला गेल्यानंतर ASB कडे याचा तपास देण्यात आला होता. एएसबीचे म्हणणे आहे की जाहिरातीमध्ये एकही कॅरेक्टर (पात्र) चुकीच्या पद्धतीने दाखवलेले नाही. किंवा असेही केले गेले नाही की एका पात्रने दुसऱ्याचा काही अपमान करणारे कृत्य किंवा शब्द उच्चारले आहे. निंदा केली नाही किंवा खिल्लीही उडवलेली नाही. जाहिरातीत कोणत्याही धार्मिक आचारसंहितेचे उल्लंघन झालेले दिसत नाही. 
बातम्या आणखी आहेत...