आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यांच्या माध्यमातून धोका ओळखणारे कॅमेरे; जानेवारी 2019 पासून बसवण्याची प्रक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- डोळ्यांच्या बुबुळांद्वारे  हृदयाच्या स्पंदनांतून संभाव्य धोका ओळखून सक्षम कॅमेऱ्यातून दहशतवादी कारवाया उघडकीस आणता येतील. इस्रायलच्या तंत्रज्ञानावर आधारित कॅमेऱ्यांच्या अतिसंवेदनशील विमानतळ, अंतराळ संशोधन केंद्र आणि अणुकेंद्रावर चाचण्या घेण्यात येणार आहेत. हे कॅमेरे लोकांचे संवाद एेकून व एका विशिष्ट साॅफ्टवेअरच्या माध्यमातून त्यांचे हावभाव टिपतील.

 कोणत्याही भाषेतील संवेदनशील शब्दांचा उच्चार एेकताच हे सॉफ्टवेअर सक्रिय होईल व सुरक्षा एजन्सीला संभाव्य धोक्याची माहिती पाठवेल. कॅमेरे त्याच्यावर लक्ष ठेवून असतील.
 
डोळ्याच्या माध्यमातून हृदयाची स्पंदने ओळखणार : एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले, शरीरातील सर्व अवयव कोणत्या ना कोणत्या प्रकारे डोळ्याशी जोडले गेले आहेत. शरीराच्या अवयवांच्या हालचालींचा परिणाम डोळ्यातून पाहता येणार आहे. यामध्ये काेणाच्याही हृदयाची स्पंदने  डोळ्याच्या माध्यमातून ओळखता येतील. घाबरलेल्या अवस्थेत हृदयाची स्पंदने वाढतात. त्याचा परिणाम डोळ्यांच्या बुबुळावर होतो. बुबुळांचा आकार लहान  होऊ लागतो. कॅमेरा बुुबुळांच्या काळ्या कडांवर लक्ष ठेवून असेल. त्याच्या आकारात बदल होताच तो संभाव्य धोका ओळखून कार्यरत होईल.  

तीन स्तरांवर सुरक्षा एजन्सीज संभाव्य धोका जाणून घेतील
अत्याधुनिक तंत्राने मानवी बुद्धिमत्तेचा वापर केला जाईल.   विमानतळावर कॅमेऱ्याने ज्याच्या हृदयाची स्पंदने वाढली आहेत व चेहऱ्यावर तणाव दिसत असेल तर अशा प्रकारचा संशयित हालचाल करणारा प्रवासी पाहताच  तत्काळ मानवी गुप्तचर विभाग सक्रिय होईल.  त्याच्या तणावाची कारणे काय आहेत, हे जाणून घेतले जाईल. 
 
जानेवारी २०१९ पासून सुरू होणार बसवण्याची प्रक्रिया
सीआयएसएफच्या तांत्रिक पथकाने गरजेनुसार, कॅमेऱ्याच्या स्पेसिफिकेशन व कन्सेप्ट नोटवर कार्य सुरू केेले आहे. हे काम जुलै २०१८ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर गरजेनुसार सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम सुरू होईल. जुलैपासून डिसंेबर २०१८ पर्यंत याचे सादरीकरण होऊ शकते. जानेवारी २०१९ पासून कॅमेरे बसवण्याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...