आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटेन दौऱ्यात मोदींना ‌द्यावे लागणार असिहष्णुतेवर उत्तर, UK करणार प्रश्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन/नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 12 नाव्‍हेंबरला ब्रिटन दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, तिथेही त्‍यांना भारतात वाढत असलेल्‍या असहिष्णुतेच्‍या मुद्दयाला सामोरे जावे लागणार आहे. एवढेच नाही तर यावर ब्रिटन सरकार त्‍यांना प्रश्‍न करणार असल्‍याचे ब्रिटनचे परराष्‍ट्र मंत्री फिलिप हेमंड यांनी स्‍पष्‍ट केले.

भारताच्‍या वर्तमान स्‍थ‍ितीवर ब्रिटन रेटिंग एजेंसी मूडीजने दिलेल्‍या अहवालात मोदी सरकारबाबत प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थ‍ित केले. दरम्‍यान, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग म्‍हणाले, ''तुम्‍ही दुसऱ्यावर तुमच्‍या धार्मिक भावना लादू शकत नाहीत. परंतु, अभिव्‍यक्‍ती स्‍वातंत्र्यांचा गळा घोटणे म्‍हणजे देशाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेला धोका आहे,'' असे ते म्‍हणाले.
मूडीजने नेमके काय म्‍हटले होते ?
मोदी यांनी आपल्‍या वाचाळ मंत्र्यांवर नियंत्रण आणावे, असा सल्‍ला रेटिंग एजेंसी मूडीज अॅनालिटिक्सने आपल्‍या अहवालातून दिला होता. अहवालात म्‍हटले, जर असेल चालले तर मोदी सरकार देशात आणि आंतरराष्‍ट्रीय पातळीवर आपली चमक गमावून बसेल.

ब्रिटेनच्‍या पतराष्‍ट्रीय मंत्र्यांनी काय म्‍हटले ?
मूडीजच्‍या अहवालाबाबत ब्रिटेनच्‍या परराष्‍ट्र मंत्री हेमंड यांना प्रश्‍न विचारला असता ते म्‍हणाले, "मोदी यांना या मुद्दयाची माहिती आहे. मला आशा आहे की ते ब्रिटनमध्‍ये आल्‍यानंतर अनिवासी भारतीय या बाबत निश्चितच त्‍यांच्‍याकडे विचारणा करतील.दरम्‍यान, पंतप्रधान डेविड कॅमरन हेसुद्धा त्‍यांच्‍यासोबत काही मुद्दयावर चर्चा करतील. कारण मोदी हे शास्‍वत विकास, अर्थव्‍यवस्‍थेत सुधार आणि भारतात इतर देशातील गुंतवणूक वाढीस लागावी यावर बोलतात. त्‍या आधारे ही चर्चा असू शकते.
मनमोहनसिंग यांनी काय म्‍हटले ?
माजी पंतप्रधान मनमोहसिंग यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्‍या 125 व्‍या जयंती कार्यक्रमात म्‍हटले, ''विरोधकांचा आवाज दाबल्‍याने अर्थव्‍यवस्‍थेला मोठा धोका होऊ शकतो. सध्‍या देशातील कट्टर विचारधारेच्‍या व्‍यक्‍तींकडून अभिव्यक्‍ती स्‍वातंत्र्यावर गदा आणली जात आहे, ही बाब चिंतनशील आहे. धर्म हा वैयक्तिक आहे. त्‍यामुळे कुणीच, मग ते सरकार का असेना त्‍यांनी त्‍यात दखल देऊ नये. तुम्‍ही दुसऱ्यावर तुमच्‍या धार्मिक भावना लादू शकत नाहीत," असे ते म्‍हणाले.
काय आहे #Intolerance चा वाद, आतापर्यंत कुणी परत केले पुरस्‍कार ?
> गोमांस खाल्‍ल्‍याच्‍या संशयावरून यूपीतील दादरी जिल्‍ह्यात एका व्‍यक्‍तीची ठेचून हत्‍या करण्‍यात आली. त्‍यापूर्वी कन्नड लेखक कलबुर्गी यांची हत्‍या करण्‍यात आली. त्‍यानंतर देशातील पुरोगामी लेखक, कलावंत यांनी पुरस्‍कार परत करण्‍यास सुरुवात केली.
> आतापर्यंत 40 पेक्षा अधिक लेखकांनी आपला साहित्य अकादमी पुरस्कार परत केला.
> 13 इतिहासकार आणि काही वैज्ञानिकांनीही आपला राष्ट्रीय पुरस्कार परत केला.
> दिवाकर बनर्जी यांच्‍यासह आतापर्यंत 10 चित्रपट निर्माता, दिग्‍दर्शकांनीही आपला राष्‍ट्रीय पुरस्‍कार परत केला.
> गुरुवारी लेखिका अरुंधती रॉय आणि ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाचे दिग्‍दर्शक कुंदन शाह यांच्‍यासह 24 चित्रपटा निर्माता, दिग्‍दर्शकांनी आपला राष्‍ट्रीय पुरस्‍कार परत करण्‍याची घोषणा केली.
> देशात असहिष्णुता वाढत असून, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी चूप आहेत, असा आरोप या सर्वांनी केला आहे.
> गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्‍यासह इतर मंत्री म्‍हणाले, या प्रकरणावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यावर प्रश्‍न उपस्‍थ‍ित करणे योग्‍य नाही.