आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपन्या इन्फ्रास्ट्रक्चर सुधारत नसल्यामुळे कॉल ड्रॉप : ट्राय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- टेलिकॉमकंपन्या टॉवर आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चरवर कमी गुंतवणूक करत असल्यामुळे देशात कॉल ड्रॉपची समस्या मोठ्या प्रमाणात येत आहे. कॉल ड्राॅपवर कंपन्यांना द्याव्या लागणाऱ्या परताव्याच्या निर्णयावर दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी ट्रायने हा दावा केला आहे. ज्या प्रमाणात कंपन्यांचे ग्राहक वाढत आहेत, त्या प्रमाणात कंपन्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करत नसल्याचे ट्रायने सांगितले आहे.

कॉल ड्रॉप झाल्यास ग्राहकांना भरपाई देण्याचा निर्णय एक जानेवारीपासून लागू होणार होता. मात्र, त्या आधी कंपन्यांनी न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती जी. रोहिणी आणि न्यायमूर्ती जयंत नाथ यांच्या पीठाने यावर गुरुवारी सुनावणी घेतली. ट्रायने दिलेल्या शपथपत्रावर न्यायालयाने कंपन्यांकडे उत्तर मागितले आहे.

कंपन्यांच्या एकूण उत्पन्नामध्ये डाटामुळे वाढ झाली असली तरी कंपन्या "व्हाॅइस कॉल'कडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. ग्राहकांना सर्वात आधी व्हाॅइस कॉलच्या सुविधेची अावश्यकता आहे. त्यासाठी २०१५ मध्ये देशभरात अनेक चाचण्या करण्यात आल्याचे ट्रायने सांगितले. मात्र, कंपन्यांनी नेटवर्कमध्ये विशेष सुधारणा केलेल्या नाही. नेटवर्कमध्ये सुधारण्या करण्यासाठी जी काही गुंतवणूक केली नाही, ती फक्त ट्रायने वारंवार जोर दिल्यामुळे झाली असल्याचेही न्यायालयात सांगण्यात आले. सध्या दिल्ली, मुंबई, सुरत, कोलकाता, पुणे, इंदूर आणि भुवनेश्वरमध्ये कॉल ड्रॉपवर चाचणी सुरू असल्याची माहिती ट्रायच्या एका अधिकाऱ्याने दिली. ही चाचणी २१ डिसेंबरपासून सुरू झाली असून आठ जानेवारीपर्यंत चालणार आहे.

असा होता आदेश
कंपनीप्रत्येक काॅल ड्रॉपवर ग्राहकाला एक रुपया भरपाई देईल. कोणत्याही ग्राहकाला एका दिवसात जास्तीत जास्त तीन कॉल म्हणजेच तीन रुपये भरपाई मिळेल, तर दुसरीकडे कंपनीच्याच नेटवर्कमध्ये कॉल सुरू किंवा ड्रॉप झाला पाहिजे, अशीही अट आहे. ट्रायच्या वतीने १६ ऑक्टोबरला हा आदेश देण्यात आला होता.

टॉवरवर क्षमतेपेक्षा चार टक्के जास्त ओझे
काॅलआणि डाटा ट्रॅफिकचा विचार केल्यास देशातील कंपन्यांनी इतर देशांच्या तुलनेत कमी टॉवर लावले आहेत. चायना मोबाइल कंपन्यांनी ४३० ग्राहकांवर एक टॉवर लावले आहे, तर भारतीय कंपन्यांनी १,२०० ग्राहकसंख्येवर एक टॉवर लावले आहे.
बातम्या आणखी आहेत...