आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्करोगाचे निदान होईल आता फक्त चोवीस तासांत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- जोधपूर एम्समध्ये कर्करोगाच्या तपासासाठी बायोप्सी तपास अहवाल केवळ २४ तासांत दिला जातो. एम्स व्यवस्थापनाकडून हा दावा करण्यात आला आहे. देशातील ही पहिलीच सुविधा आहे. देशातील इतर संस्थांमध्ये अशा प्रकारचा अहवाल प्राप्त होण्यासाठी किमान ७ ते १० दिवस कालावधी लागतो. कर्करोगाचा अहवाल चोवीस तासांत मिळावा यासाठी एम्सच्या पॅथॉलॉजी प्रयोगशाळेत अत्याधुनिक उपकरणे लावण्यात आली आहेत, अशी माहिती आर. आर. मिलिट्री हॉस्पिटलचे माजी विशेषज्ञ डॉ. भट्टाचार्य यांनी दिली.

एक स्लाइड, मल्टिपल व्ह्यू
एम्सच्या मेडिकोजला कर्करोगाचे निदान आणि उपचार करण्याचा सल्ला देण्यासाठी येथे पेंटाहॅड मायक्रोस्कोप लावण्यात आला आहे. त्याच्या मदतीने डॉक्टर पाहत असलेली स्लाइड विद्यार्थी पाहू शकतात. डॉक्टरांची टीम एकाच वेळी स्लाइडचा तपास करू शकते.

दहा मिनिटांत अहवाल
कोणत्याही शस्त्रक्रियेदरम्यान कर्करोगाची शक्यता दिसल्यास एम्सचे डॉक्टर येथील प्रयोगशाळेतील फ्रोजन विभागाच्या मदतीने १० मिनिटांत बायोप्सी करून कर्करोग आहे किंवा नाही, याचे निदान करता येईल, असा दावा करण्यात आला आहे.

निदान करण्यासाठी तपासणी
प्रयोगशाळेत लिक्विड बेस्ड सायटॉलॉजी चाचणीतून सर्व्हिक्स कर्करोग आहे किंवा नाही, याचे निदान करणे शक्य होणार. त्याच्या मदतीने कर्करोग होण्याच्या अगोदरच त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करता येणार. त्याचबरोबर उपचारदेखील करता येतील.