आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्करोगाच्या रुग्णांत वाढ; खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा पुढाकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशातील असंसर्गजन्य रोगांच्या वाढत्या प्रकारावर अंकुश लावण्यासाठी खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांनीदेखील पावले उचलली आहेत. अशा रोगांच्या उपचारासाठी जिल्हे दत्तक घेण्याचा प्रस्ताव महाविद्यालयांनी आरोग्य मंत्रालयाकडे सादर केला आहे. कर्करोग आणि मधुमेहासारख्या रोगांचे नि:शुल्क उपचार करण्याचा प्रस्ताव प्रथमच मांडल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी सांगितले आहे. खासगी महाविद्यालयांच्या आणि रुग्णालयांच्या या पुढाकारामुळे मंत्रालयाने सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांनीदेखील अशा योजना सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

योजनेअंतर्गत कर्करोग आणि मधुमेही रुग्णांना सुपर स्पेशालिटी सेवा प्रदान करता येईल, असे खासगी रुग्णालयाकडून सांगण्यात आले. हा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाच योजनेच्या धर्तीवर प्रत्येक सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांनीदेखील एक जिल्हा दत्तक घ्यावा या योजनेमुळे गरीब रुग्णांना कर्करोग आणि मधुमेहासारख्या घातक आजारांच्या उपचारात मदत होईल, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

कर्करोगाच्या रुग्णांत वाढ
देशातील कर्करोगाच्या एकूण प्रकारात सुमारे 2-3 टक्क्यांनी वाढ झाल्याचे आयसीएमआरच्या अहवालात सांगितले आहे. सध्या देशातील 27 % रुग्णांना तंबाखूमुळे कर्करोग झाला आहे. 10 टक्के फुफ्फुसाचे कर्करोगी आहेत.

मंत्र्यांची बैठक
विविध रोगांच्या निर्मूलनासाठी जगात सुरू असलेल्या अभियानाअंतर्गत जागतिक आरोग्य संघटनेतर्फे (डब्ल्यूएचओ) दक्षिण पूर्व देशाच्या आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक पुढील आठवड्यात दिल्लीत पार पडणार आहे.