आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Candidate's Future Decided By Hukka Gudgudi In National Capital

हुक्क्याच्या गुडगुडीवर राजधानीत उमेदवाराचे भवितव्य ठरणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाची राजधानी आधुनिक असेल, असे चित्र सहज मनात येते; परंतु दिल्लीचा ग्रामीण भाग त्यापेक्षा खूप वेगळा आहे. सुमारे 112 खेड्यांत शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम दिसते. गावातील पारावर बसून बुजुर्ग हुक्का ओढताना दिसतात.कामधंद्याला जाण्यापूर्वी तरुण मंडळीही पारावर काही वेळ थांबून हुक्का ओढून पुढे जातात. एवढेच नाही, हुक्क्याच्या गुडगुडीत चर्चा झडतात. तेथेच निवडणुकीतील उमेदवाराचे भवितव्यदेखील ठरते.
असा होतोय प्रचार
दक्षिण दिल्लीच्या छतरपूरमध्ये भाजप उमेदवार ब्रह्मसिंह तंवर दौरा करतात आणि गावातील पारावर बसलेल्या बुजुर्गांचा आशीर्वाद घेतात. त्या वेळी बुजुर्ग मंडळी आशीर्वाद देताना म्हणतात, या वेळी मत भाजपलाच दिले जाईल. त्यानंतर काही वेळाने काँग्रेस उमेदवार बलराम तंवरदेखील पारावर दाखल होतात. स्वत:ची ओळख सांगून आशीर्वाद घेतात. बुजुर्ग त्यांना विजयी होण्याचा आशीर्वाद देतात. अशा प्रकारे प्रत्येक उमेदवार पारावर येऊन वृद्धांचा आशीर्वाद घेत असल्याचे दिसून येत आहे.
गप्पा रंगू लागल्या : पारावर बसलेल्या ग्रामस्थांमध्ये बहुतेक सर्व राजकीय पक्षांचे समर्थक असतात. कमकुवत उमेदवार किंवा पक्षाच्या समर्थकांची गाण्यातून टिंगल उडवली जाते. कलंकित उमेदवारांवरदेखील खूप चर्चा केली जाते आणि त्याच्या समर्थकांचे कान उपटले जातात.
पाराची वैशिष्ट्ये : पारावर बसून बुजुर्ग ग्रामस्थांनी घेतलेले निर्णय उमेदवारासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. ही वृद्ध मंडळी चांगल्या उमेदवाराचा खेळ चौपट करू शकतात. म्हणूनच उमेदवार पारावर एक चक्कर आवर्जून मारतात आणि विजयाचे आवाहन करतात.
हरियाणाच्या नेत्यांचा गोतावळा
दिल्ली ग्रामीण भागात गुर्जर-जाट समुदायाची संख्या खूप अधिक आहे. त्यांचे नातेवाईक हरियाणाच्या फरिदाबाद, गुडगाव, झज्जर, रोहतक, सोनिपतसारख्या भागात मोठ्या प्रमाणात आहेत.
हरियाणा भाजपचे अध्यक्ष रामबिलास शर्मा, माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार कृष्णपाल गुर्जर, कॅप्टन अभिमन्यू, माजी खासदार सुधा यादव, वीरकुमार यादवसह संपूर्ण नेते दिल्लीच्या या भागात राहतात. कृष्णपाल गुर्जर- कस्तुरबानगर, वीरकुमार यादव- कृष्णानगर, कॅप्टन अभिमन्यू व सुधा यादव- महरौली, मनोहरलाल- जनकपुरी निवडणुकीत उतरले आहेत. याप्रमाणेच हरियाणा काँग्रेस व ‘इनेलो’ नेतेही दिल्ली निवडणुकीत जोरदार प्रचार करू लागले आहेत. फरिदाबादचे खासदार अवतारसिंह भडाना, हरियाणाचे राजस्व मंत्री चौधरी महेंद्र प्रतापसिंह, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. ओझासह आघाडीचे नेते काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करू लागले आहेत.