आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cane Sowing At 44.8 Lakh Tons Till 15th July, Records Decline Of 2.8% Humphrey B Neill

ऊसाचे लागवड क्षेत्र घटले, महाराष्‍ट्रात 23 ट‍क्‍के घट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- शेतकरी ऊसाच्‍या लागवड क्षेत्रात घट करीत आहे. कृषी मंत्रालयाच्‍या आकडेवारीनुसार 15 जुलै पर्यंत देशात 44.8 लाख हेक्‍टरमध्‍ये ऊसाची लागवड झाली आहे. ही लागवड गेल्‍यावर्षीच्‍या तुलनेत कमी आहे.गेल्‍या वर्षी 46.1 लाख हेक्‍टरमध्‍ये ऊसाची लागवड झाली होती.खरिप हंगामासाठी सर्वसाधारण 48.4 लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. साखरेची किंमत सतत कमी होत असल्‍याने ऊसालाही कमी भाव मिळत असल्‍याने शेतक-यांना ऊस उत्‍पादनात तोटा होत असल्‍याने शेतकरी ऊसाचे क्षेत्र कमी करून इतर पीकांचे उत्‍पाअन घेत आहे.
महाराष्‍ट्रात 23 ट‍क्‍के घट
देशातील सर्वात जास्‍त उत्‍पादन उत्‍तर प्रदेशमध्‍ये घेतले जाते.तेथील ऊस लागवडक्षेत्रात 0.90 टक्‍केवरून 19.6 लाख क्षेत्र झाले आहे.तर महाराष्‍ट्रात 22.7 टक्‍के कमी झाले आहे.महाराष्‍ट्रात 15 जुलैपर्यंत 8.21 लाख हेक्‍टरमध्‍ये ऊसाची लागवड शेतक-यांनी केली आहे. कर्नाटकमध्‍ये 23.8 टक्‍के आणि तमिळनाडुमध्‍ये 17.1 टक्‍के वाढ झाली आहे.
6 वर्षातील निचांकी कीमत
साखरेची किंमती कमी कमी होत आहे.आंतरराट्रीय बाजारपेठेत साखरेची किंमतीने गेल्‍या 6 वर्षांतील निचां‍क गाठला आहे.देशांतर्गत बाजार पेठेत साखरेची किंमत 2200 रूपये प्रति क्विंटल पेक्षाही कमी आहे. गेल्‍या दोन दीवसात साखरेची 70 रूपयाने किंमतीत घट झाली आहे.

राज्‍य निहाय ऊस लागवड क्षेत्र पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...