आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीवर जेटलींचा सल्ला घेतला होता का? अर्थमंत्रालयाने नाही दिले RTI चे उत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कायद्यातील संरक्षणाचा आधार घेत अर्थमंत्रालयाने उत्तर देण्याचे टाळले. - Divya Marathi
कायद्यातील संरक्षणाचा आधार घेत अर्थमंत्रालयाने उत्तर देण्याचे टाळले.
नवी दिल्ली - आरबीआय नंतर केंद्रीय अर्थमंत्रालयानेही नोटबंदीबाबत विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देण्याचे टाळले आहे. 8 नोव्हेंबरला नोटबंदी लागू झाली त्याआधी अरुण जेटली यांचा सल्ला घेतला गेला होता का ? महिती अधिकारात (आरटीआय) विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर आरटीआय कायद्यात मिळालेल्या सुटचा लाभ घेत टाळण्यात आले आहे. मोदी सरकारने 500/1000 रुपयांचा नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. याचा थेट संबंध भारतीय रिझर्व्ह बँकेशी होता, त्यांनीही यासंबधीच्या प्रश्नांचे उत्तर दिलेले नाही. 
 
- न्यूज एजन्सी पीटीआयने यासंबंधीची माहिती RTI अंतर्गत विचारली होती. त्याच्या उत्तरात मंत्रालयाने म्हटले, 'विचारलेली माहिती महत्त्वपूर्ण आहे. यासंबंधीची माहिती उपलब्ध आहे मात्र आरटीआयमध्ये त्याचा खुलासा केला जाऊ शकत नाही.'
- मंत्रालयाने यासाठी सेक्शन  8(1)(A) अंतर्गत सुट मिळाली असल्याचा हवाला दिला. या सेक्शन अंतर्गत सरकार देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेला धोका निर्माण होईल, कुटनीती आणि आर्थिक व्यवहार, दुसऱ्या देशांसोबतचे संबंध खराब होतील अशी माहिती सार्वजनिक करत नाही.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...