आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Can't Hide Info, Get On To Social Media Aggressively: Rajyavardhan Rathore To Officials

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘पोलादी पडदा’ दूर करा, सोशल मीडिया वापरा - राज्यवर्धन राठोड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकारी कारभार म्हणजे ‘पोलादी पडदा’ मानला जातो. परंतु असे मानण्याचा काळ आता राहिलेला नाही. म्हणून सरकारने जनतेपर्यंत अचूक माहिती पुरवली पाहिजे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर अधिक आक्रमकपणे करण्याची गरज आहे, असे माहिती व प्रसारणमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी म्हटले आहे.

पारंपरिक पद्धतीने कामकाज करणाऱ्या सरकार व जनतेत एक प्रकारचा पोलादी पडदा पाहायला मिळतो. त्यामुळे पहिल्यांदा आपण मानसिकता बदलण्याची गरज आहे. सध्याच्या जगात तुम्ही माहिती दडवून ठेवू शकत नाहीत. माहितीची देवाण-घेवाण करावीच लागते, असे राठोड म्हणाले. अनेक लोक सोशल मीडियातील चर्चेला वायफळ ठरवतात. परंतु चालू घडामाेडींवरील मत तयार करण्याची प्रक्रिया यातून घडते. टीव्ही, मुद्रित माध्यमातील घडामाेडींशी देखील आपण अवगत होत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर सक्रिय असतात. लवकरच ते सोशल मीडियावरील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. अधिकाऱ्यांनीही त्यात मागे राहता कामा नये.
बातम्या आणखी आहेत...