आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Can’t Nix Rape Case Even After Compromise Supreme Court

तडजोड केली तरी खून-कुकर्माचे आरोप कायम, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बलात्कार झालेली तरुणी आणि आरोपीमध्ये तडजोड झाली तरी अत्याचार आणि खुनाचा आरोप रद्द होऊ शकत नाही. अशा गंभीर प्रकरणाची कार्यवाही रोखली जाऊ शकत नाही,असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
महिलेवरील अत्याचार आणि खूनप्रकरणातील अनेक दोषींनी सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल केल्या होत्या. यामध्ये दोषींनी आपल्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यांची सुनावणी रद्द करण्याची मागणी केली होती. अत्याचारग्रस्तांशी महिलेशी तडजोड केल्याचा आधार त्यासाठी त्यांनी घेतला होता. न्या. रंजना प्रकाश देसाई आणि न्या. एन. व्ही. रामना यांच्या पीठासमोर या याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली. उच्च न्यायालये प्रत्येक खटल्यात वास्तव व वस्तुस्थिती पाहता सद्सद्विवेकबुद्धीचा वापर करू शकतात. मात्र, गंभीर गुन्ह्यांचे खटले दोन व्यक्ती आणि गटांमध्ये तडजोड झाल्याचे कारण देत मर्यादित ठेवू शकत नाहीत. अशा गुन्ह्यातील आरोप फेटाळल्यास समाजामध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

पिस्तूल दाखवून सामूहिक बलात्कार
नवी दिल्ली - पश्चिम दिल्लीच्या उत्तमनगरमध्ये पाच लोकांनी पिस्तुलाचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. 19 जुलैच्या या घटनेत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये दोन अल्पवयीन आहेत. अत्याचारग्रस्त तरुणी दहावीची विद्यार्थिनी आहे. शाळेत जात असताना पाच जणांनी उत्तमनगरातील एका घरी नेले. तिथे त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून अत्याचार केल्याची तक्रार पीडिताने दिली आहे.

बंगळुरू बलात्कारप्रकरणी दोघे अटकेत
बंगळुरू - बंगळुरूच्या सहा वर्षांच्या बलात्कार प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मुलीवर बलात्कार नव्हे तर सामूहिक बलात्कार झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणात सोमवारी रात्री उशिरा दोन आरोपींना अटक करण्यात आली. लाल गिरी आणि वसीम पाशा अशी दोन आरोपींची नावे असून दोघेही जिम्नॅस्टिक प्रशिक्षक आहेत.