आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Can't Stop Men From Peeing In Public : Delhi High Court

पँटला टाळे लावण्यास सांगू शकत नाही - दिल्ली उच्च न्यायालय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणार्‍यांची सवय मोडण्यासाठी दुसरा मार्ग शोधावा लागेल. घरातून निघताना पँटच्या झिपला टाळे लावा, असा आदेश कोर्ट देऊ शकत नाही, अशी टिप्पणी दिल्ली उच्च न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान केली.

लोक लघुशंका करत असल्याने घराच्या भिंती किंवा कंपाउंडवरील देवतांची चित्रे काढण्याचे आदेश देण्याची मागणी करणारी मनोज शर्मा यांची याचिका न्यायालयाने फेटाळली. न्यायमूर्ती प्रदीप नंदाजोग आणि दीपा शर्मा यांच्या खंडपीठासमोर म्हटले, कुणीही लघुशंका करू नये म्हणून देवतांचे फोटो लावले जातात, तरीही लोकांची सवय मोडत नाही. पण त्यांना कोर्ट रोखू शकत नाही तसेच भिंतींवर देवतांची चित्रे लावण्यास मनाई करणारे आदेश देऊ शकत नाही.

याचिकेसोबत जोडलेल्या एका छायाचित्राचा उल्लेख द्विसदस्यीय पीठाने केला. त्यातील भिंतीवर लिहिले होते, ‘देखो, यहाँ कुत्ता और गधा पेशाब कर रहा है.’ आता असे लिहूनही लोक ऐकत नाहीत. परंतु मानव ही निसर्गाची सर्वर्शेष्ठ निर्मिती आहे. त्यामुळे देवाच्या समोर अथवा रस्त्यावर उघडा होणार नाही, अशी आशाही न्यायालयाने व्यक्त केली.