आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदीनंतर पगाराचा पहिला दिवस : पगार 24 हजारांपेक्षा जास्त; एकरकमी काढणे अशक्य!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटबंदीनंतर पगाराचा पहिला दिवस येत आहे. सरकारीपासून बहुतांश खासगी कर्मचाऱ्यांचे पगार ३० ते ७ तारखेदरम्यान हाेतात. केवळ केंद्र सरकारचेच ५० लाख कर्मचारी व ५८ लाख निवृत्त कर्मचारी आहेत. पगाराबाबत तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या...
मला पूर्ण पगार मिळेल?
पगार बँकेतून होत असेल व २४ हजारांपेक्षा कमी वेतन असेल तर तुम्ही पूर्ण पगार एकाच वेळी काढू शकता.
वेतन २४ हजारांपेक्षा जास्त असल्यास?
वेतन खात्यात जमा होत असेल तर एका वेळी पूर्ण वेतन काढता येणार नाही. प्रत्येक आठवड्यात पैसे काढण्याची मर्यादा २४ हजार असल्याने दर आठवड्यास २४-२४ हजार याप्रमाणे काढता येतील.

बँकांत कॅशचे संकट आहे?
ज्या बँकेत जास्त वेतन व पेन्शन खाती आहेत त्यांना २०-३० % जास्त कॅश दिली जात आहे. वेतनासाठी रोकड असावी यासाठी बँकांनी गेल्या ४-५ दिवसांत एटीएम व काउंटरवर कॅश फ्लो कमी केला आहे.

ज्यांना कॅशमध्ये २४ हजारांपेक्षा जास्त वेतन मिळत होते त्यांचे कसे?
त्यांना काही अडचणी येऊ शकतात. काही लहान कंपन्या, कारखान्यांना ५० हजार काढण्याची सूट आहे. मात्र, प्रत्येकवेळी बँकेतून पूर्ण पैसे मिळत नाहीत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना अकाउंट उघडण्यासाठी विशेष कँप लावण्यास सांगितले आहे.
बँकांना खास तयारी केली काय?
होय. बँकांनी आरबीआयकडून जास्त कॅश मागितली आहे. आपल्या एटीएममध्येही पुरेशा पैशाची व्यवस्था आहे. एसबीआय, आयसीआयसीआय,यूबीआय आदींनी अतिरिक्त काउंटर सुरू होणार असल्याचे म्हटले आहे. एसबीआयच्या शाखा लवकर उघडतील. ज्येष्ठांच्या पेन्शनसाठी विशेष काउंटर सुरू केली जातायत.
बातम्या आणखी आहेत...