आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनालीमध्ये बुडालेल्या भारतीय जहाजातील 10 बेपत्ता लोकांचा शोध सुरु, नेव्हीने पाठवले प्लेन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इंडियन नेव्हीच्या के पी-81 प्लेनने  मनालीजवळ बुडालेल्या भारतीय मालवाहू जहाजातील (cargo vessel)10 प्रवाशांचा शोध सुरु केला आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे. एमराल्ड स्टार नावाचे जहाज फिलिपिन्सच्या कोस्टजवळ पॅसिफिक महासागरात शुक्रवारी बुडाले होते. यामध्ये 26 भारतीय प्रवास करत होते. तीन शिपच्या मदतीने आतापर्यंत 16 भारतीयांना वाचवण्यात आले आहे.

- इंडियन नेव्हीने म्हटले आहे, की पी-81 प्लेन आपल्या तळावरुन रविवारी रात्री 11.45 वाजता रवाना झाले होते. सोमवारी सकाळपासून त्याने शोधकार्य सुरु केले आहे. 
- पी-81 हे दोन एसआरए किटने सज्ज आहे. त्यामध्ये एक छोटी बोटही आहे, ज्यामध्ये 10 लोक बसू शकतात. त्यामध्ये आपतकालिन स्थितीत अन्नाची व्यवस्था आहे. 
शेजारून जाणाऱ्या जहाजाने लोकांना वाचवले 
- एमराल्ड स्टारमध्ये एकूण 26 भारतीय होते. त्यातील 15 जणांना जहाज बुडाल्यानंतर तेथून जाणाऱ्या डेन्सा कोबा जहाजातील लोकांनी वाचवले. 
 
धोक्याचा इशाराही दिला होता 
- जपानच्या कोस्टगार्डने म्हटल्याप्रमाणे 33 हजार 205 टनांचे एमराल्ड स्टार एका वादळात अडकले होते. त्यानंतर जहाजाने आपतकालिन मेसेज पाठवला होता. 
- बेपत्ता क्रू मेंबर्समध्ये मुंबईचे कॅप्टन राजेश नायर यांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांच्या पत्नी रश्मि यांना त्यांचा शोध घेतला जाईल असे आश्वस्त केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...