आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापमं घोटाळा : CARTOONS मधून पाहा देशातील नागरिकांचा रोष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दैनिक भास्करचे कार्टूनिस्ट हरिओम यांचा व्यापमंवरील कटाक्ष - Divya Marathi
दैनिक भास्करचे कार्टूनिस्ट हरिओम यांचा व्यापमंवरील कटाक्ष
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेशातील व्यापमं (व्यावसायिक परीक्षा मंडळ) घोटाळ्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करेल असा गुरुवारी आदेश दिला. घोटाळ्यासोबतच या प्रकरणाशी संबंधीत लोकांच्या संशयास्पद मृत्यूचीही चौकशी सीबीआय करेल असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. 24 जुलै रोजी या प्रकरणाचा पहिला अहवाल सुप्रीम कोर्टात सादर होणार आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्ट निर्णय घेणार आहे, की त्यांच्या देखरेखीखाली तपास होईल किंवा नाही. कोर्टाने गुरुवारी सीबीआय तपासाच्या आदेशाबरोबरच केंद्र सरकार आणि मध्यप्रदेशचे राज्यपाल रामनरेश यादव यांनाही नोटीस बजावली आहे.

व्यापमं घोटाळ्याची सोशल मीडिया, वृत्तपत्रे, ट्विटर, फेसबुक आणि देशभर चर्चा सुरु झाली असून व्यंगचित्रकारांनाही नवा विषय मिळाला आहे. व्यंगचित्रकारांनी त्यांच्या रंग रेषातून व्यापमं घोटाळ्याबद्दलचा सर्वसामान्यांचा राग व्यक्त केला आहे.
या पॅकेजमधून पाहा, देशातील प्रसिद्ध कार्टूनिस्टचे व्यापमंवरील फटकारे.