नवी दिल्ली - पाकिस्तानच्या आयएसआयला माहिती पुरवल्याचा आरोप असलेल्या माजी भारतीय राजनयिक अधिकारी माधुरी गुप्तांवर गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याप्रकरणी खटला चालवण्यात येणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश प्रतिभा राणी यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. आरोप सिद्ध झाल्यास १४ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. माधुरी गुप्ता इस्लामाबादेत भारतीय दूतावासात सचिव (द्वितीय) म्हणून कार्यरत होत्या. त्यांना २० एप्रिल २०१० रोजी अटक करण्यात आली होती. त्यांचे आयएसआय अधिकारी जमशेदसोबत संबंध होते. व त्याच्याशी िववाह करण्याचा त्यांचा विचार होता.
पुढील स्लाइडमध्ये, माधुरी गुप्ताने काय केले होते..