आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आप\'च्‍या आणखी एका आमदारावर विनयभंगाचा आरोप, गुन्‍हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे (आप) सर्वात तरुण आमदार प्रकाश जारवाल यांच्‍यावर एका महिलेने विनयभंगाचा आरोप केला. त्‍या आधारे पोलिसांनी त्‍यांच्‍या विरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. पूर्व दिल्लीतील देवळी परिसरात ही घटना घडली. विशेष म्‍हणजे जारवाल याच विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्‍व करतात. यापूर्वी 'आप'चे दिनेश मोहनिया यांच्‍यावरसुद्धा अशाच प्रकारचा आरोप झाला होता. पोलिसांनी त्‍यांना पत्रकार परिषदेमधून अटक केली होती.
काय आहे आमदार प्रकाश जारवाल यांच्‍यावर आरोप...
> महिलेने सांगितले, '' 2 जून रोजी मी पाणीटंचाईची समस्‍या घेऊन ग्रेटर कैलास येथील दिल्ली जल बोर्ड ऑफिसमध्‍ये गेले होते. त्‍या ठिकाणी आमदार मोहनिया यांनी आपल्‍यासोबत गैरव्‍यवहार करून जीवे मारण्‍याची धमकी दिली. याच वेळी आमदार जारवाल यांनी मला धक्‍का मारला'', असा आरोप तिने केला.
> या प्रकरणी तिने एलजी आणि दिल्ली पोलिस आयुक्‍तांकडे तक्रार दिली होती.
> त्‍या आधारे ग्रेटर कैलास पोलिसांनी 6 जून रोजी गुन्‍हा दाखल केला.
जारवाल म्‍हणाले हे तर राजकारण...
> आम आदमी पक्षांच्‍या आमदारांविरुद्ध भाजपने रचलेला हा डाव आहे, असा आरोप आमदार जारवाल यांनी केला.
> दरम्‍यान, 'आप' हा महिलांसोबत गैरव्‍यवहार करणारा पक्ष आहे, असा आरोप दक्षिण दिल्लीचे भाजप खासदार रमेश बिधुडी यांनी केला.
जारवाल आहेत सर्वात तरुण आमदार
> प्रकाश जारवाल हे दिल्लीतील सर्वात तरुण आमदार आहेत. 2014 च्‍या विधानसभा निवडणुकीच्‍या वेळी त्‍यांचे वय 25 वर्षे होते.
> जारवाल हे एका मल्टीनेशनल कंपनीमध्‍ये सहयोगी व्‍यवस्‍थापक होते.
> अण्‍णा हजारेंच्‍या आंदोलनात भाग घेतला होता. पुढे त्‍यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ या कामासाठीच स्‍वत:ला झोकून दिले.

एका वर्षांत AAP चे 8 आमदार अटकेत

1- जितेंद्र सिंह तोमर, बनावट पदवी प्रकरण, जून 2015
2- मनोज कुमार, फसवणूक, जुलै 2015
3- सुरिंदर सिंह, मारहाण, ऑगस्‍ट 2015
4- सोमनाथ भारती, घरगुती हिंसाचार, सप्‍टेंबर 2015
5- अखिलेश त्रिपाठी, 2013 ची दंगल भडवल्‍याचा आरोप, नोव्‍हेंबर 2015
6- महेंद्र यादव, दंगा, जानेवारी 2016
7- जगदीप सिंह, मारहाणीचा आरोप, मे 2016
8- दिनेश मोहनिया, मारहाणीचा आरोप, जून 2016