आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DB SPL : केस प्रत्यारोपण क्लिनिकना ना नियम, ना नियंत्रण!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तुम्हीही सलमान खान, सौरव गांगुली, रणबीर सिंह किंवा कपिल शर्माप्रमाणे केस प्रत्यारोपण करण्याचा विचार करत आहात का? उत्तर ‘होय’ असेल तर एकदा पुन्हा विचार करा.

देशातील प्रत्येक मोठ्या शहरात केस प्रत्यारोपण केंद्रे वेगाने उघडत आहेत, पण त्यांच्या निगराणी व नियंत्रणासाठी कुठलीही व्यवस्था नाही. हे क्लिनिक ना वैद्यकीय परिषदेच्या कक्षेत आहेत ना त्यासाठी वेगळी सरकारी संस्था आहे. प्रत्यारोपण ही वैद्यकीय प्रक्रिया असली तरी ती पूर्णपणे वैद्यकीय शस्त्रक्रिया मानली जात नाही. प्रत्यारोपणाशी संबंधित असोसिएशन ऑफ हेअर रिस्टोरेशन सर्जन्स ऑफ इंडिया (एएचआरएसआय) चे सचिव डॉ. अनिल गर्ग यांच्यानुसार, डॉक्टर आणि नर्स दोन-चार दिवसांचे प्रशिक्षण घेऊन हेअर क्लिनिक उघडत आहेत. पण प्रत्यारोपण तर प्लास्टिक सर्जन, एएनटी सर्जन, जनरल सर्जन किंवा डर्मोटॉलॉजिस्टद्वारेच केले जावे. ते म्हणतात की, क्लिनिकवर नियंत्रणासाठी पंतप्रधान कार्यालयापासून ते एमसीआय आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहिले आहे तरीही नियंत्रणासाठी कुठलाही विभाग नाही. राज्यांत केस प्रत्यारोपण क्लिनिक चालणारे डायरेक्ट हेअर इम्प्लांटेशनचे सीईओ अजय बन्सल यांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही सरकारी संस्था किंवा संस्थेची निगराणी नसल्याने केस प्रत्यारोपण क्लिनिक देवाच्या भरवशावरच चालत आहेत. मोठे क्लिनिक मात्र ब्रँडसाठी योग्य डॉक्टरांची नियुक्ती करतात.

याप्रकरणी आरोग्य सेवा महासंचालनालयाचे (डीजीएचएस) प्रमुख डॉ. जगदीश प्रसाद यांनी सांगितले की, सरोगसी आणि सौंदर्याशी संबंधित घोटाळ्याची प्रकरणे नेहमीच माध्यमांत येतात. आरोग्य मंत्रालयाने अशा प्रकरणांसाठी क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट लागू केला आहे. २०१३ पासून कायदा लागू झाला असूनही राज्यांनी अजूनही तो लागू केलेला नाही. आरोग्य हा विषय राज्यांच्या यादीत असल्याने केंद्र सरकार काही करू शकत नाही. कायदा लागू न झाल्याने अशा प्रकारच्या केस प्रत्यारोपण क्लिनिक्सना ना नोंदणीची गरज आहे ना परवाना घेण्याची. दुसरीकडे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाही (एमसीआय) अशा शस्त्रक्रिया करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई करू शकत नाही. एमसीआयच्या प्रमुख जयश्री बेन म्हणतात, आम्ही वैद्यकीय शिक्षणात फक्त पदवीपर्यंतच केसांच्या देखभालीसाठी डर्मोटॉलाॅजिस्टचे शिक्षण देतो. हे काही वैद्यकीय किंवा शस्त्रक्रियेचे प्रकरण नाही. केसांच्या प्रत्यारोपणासाठी शुद्ध वैद्यकीय नसल्याने आम्ही डॉक्टरांवर कुठलीही कारवाई करू शकत नाही. अर्थात, प्रत्यारोपणादरम्यान किंवा एखाद्या डॉक्टरने हलगर्जीपणा केल्यास आणि रुग्णांच्या शरीराला नुकसान झाल्यास राज्यांच्या वैद्यकीय परिषदांकडे तक्रार करण्याची तरतूद आहे. पण आतापर्यंत अशी प्रकरणे आमच्याकडे आली नाहीत. क्लिनिक होमिओपॅथी उपचार व्यवसायानंतर केस प्रत्यारोपण व्यवसायात आलेले डॉ. बत्रा क्लिनिकचे प्रमुख डॉ. अक्षय बत्रा यांच्यानुसार, मोठ्या प्रमाणावर क्लिनिक उघडण्याचे एक मोठे कारण म्हणजे त्यात कोणत्याही विशिष्ट क्लिनिकल सर्जरीची गरज नाही. तंत्र सोपे असल्याने गायनाकॉलॉजिस्ट, डेंटिस्ट आणि ऑर्थोपेडिक डॉक्टरही असे क्लिनिक उघडत आहेत.

असे फसतात लोक :
वृत्तपत्रांत छापून येणाऱ्या काही जाहिरातींत टकलापासून सुटका मिळवण्यासाठी फक्त २०० रुपये प्रतिकेस असा दर सांगितला जातो. सुरुवातीला हा दर जास्त वाटत नाही, पण एखाद्या ५० टक्के टक्कल असलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर सुमारे ५-६ हजार केस उगवावे लागतात. कोणत्याही सामान्य माणसाला केस प्रत्यारोपणासाठी १२ लाखांपर्यंतचा खर्च करावा लागू शकतो. काही केस प्रत्यारोपण क्लिनिक १० रुपये प्रतिकेस असा दर ठेवतात. त्यामुळे एखादे खराब क्लिनिकही एखाद्या व्यक्तीकडून ६० ते ८० हजार रुपये आरामात वसूल करते. केस प्रत्यारोपण करणाऱ्या बोर्कोव्हिट्स या कंपनीचे कार्यकारी संचालक अर्पित गोयल सांगतात की, केस मोजण्याचे कुठलेही यंत्र उपलब्ध नाही. आम्ही एक यंत्र तयार केले आहे, त्याच्या मदतीने केसांची सरासरी काढणे शक्य आहे.

प्रकरण १ - प्रत्यारोपण केल्यानंतर झाला मृत्यू
चेन्नईत २२ वर्षीय वैद्यकीय विद्यार्थी संतोषकुमारने गेल्या आठवड्यात केस प्रत्यारोपण केले होते. ज्या केंद्रात शस्त्रक्रिया झाली त्याच्याकडे हेअर सलून चालवण्याचा परवाना होता. तेथे शस्त्रक्रिया कक्ष नव्हताच. नंतर या केंद्रातून परवानगीविना ठेवलेली औषधे जप्त केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रकरण २ - चेहऱ्यावर आली रिअॅक्शन
२०१३ मध्ये टेलिव्हिजनमध्ये स्क्रिप्ट रायटरचे काम करणारे भरिंद्रसिंह ढिल्लो यांनी केस प्रत्यारोपण केले. पण चेहरा, इतर अवयवांवर रिअॅक्शन आली. इलाजासाठी स्टेरॉइड घ्यावे लागले. मुंबई महानगर न्यायालयाने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे व डॉक्टरांविरोधात कारवाईचे निर्देश दिले होते.
प्रकरण ३ - सांगितले तेवढे केस आले नाही
गेल्या वर्षी कोलकात्यात बी. एस. चंद्रांकडून डॉक्टरांनी १००० केसांच्या प्रत्यारोपणासाठी प्रतिकेस ७० रुपये रक्कम निश्चित केली. शस्त्रक्रियेनंतर आधीचे व नंतरचे फोटो पाहिले तर नगण्य केसांचेच प्रत्यारोपण झाले होते. ग्राहक न्यायालयात तक्रार करण्यात आली, पण निकाल आलेला नाही.

पुढे वाचा, सलमानने केले लोकप्रिय...
बातम्या आणखी आहेत...