आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ते अपघातात जखमींवर कॅशलेस उपचार केले जातील, पंतप्रधान मोदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशात वाढत्या रस्ते अपघातांवर चिंता व्यक्त केली. रेडिओवर ‘मन की बात’मध्ये मोदी म्हणाले, सरकार लवकरच रस्ते सुरक्षा विधेयक आणेल. रस्ते अपघातातील जखमींवर कॅशलेस उपचारही केले जातील.

प्रारंभी ही सुविधा गुडगाव-जयपूर-मुंबई व एनएच -४३ या मार्गांवर सुरू झाली आहे. मोदी म्हणाले, योजनेनुसार जखमींना सुरुवातीच्या ५० तासांपर्यंत उपचारांसाठी पैशांची काळजी करण्याची गरज नाही. सरकार राष्ट्रीय रस्ते सुरक्षा धोरण व रस्ते सुरक्षा कार्ययोजनेवरही काम करत आहे. देशात प्रत्येक मिनिटाला एक अपघात, तर दर चार मिनिटांनी एकाचा मृत्यू होताे. मृतांत एक तृतीयांश लोक १५ ते २५ वयोगटातील असणे ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे.
दरम्यान, मोदींनी आपण १५ ऑगस्टला काय बोलावे, यासाठी नागरिकांकडून सूचना-सल्ले मागवले आहे. मायगोव्ह.इन, आकाशवाणी व पीएमओकडे सूचना पाठवू शकतात, असे मोदी म्हणाले.