आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cattle Grazing In Pathankot Air Base For Just Rs. 20: Report

#PathankotAttack: एअरफोर्सच्या शेडमध्ये दहशतवाद्यांनी काढली होती रात्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पठानकोट एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक नवे खुलासे समोर आले आहेत. दहशतवाद्यांनी एअरबेसवर हल्ला करण्‍यापूर्वी एअरफोर्सच्या एका रिकाम्या शेडमध्ये रात्र काढली होती. इतकचे नव्हे तर एअरबेसच्या जवळपास राहाणार्‍या लोकांची पोहोच थेट आतपर्यंत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

स्थानिक लोक अशी करत होते एअरबेसमध्ये एंट्री...
- मीडिया रिपोर्टनुसार, इंटेलिजन्स एजन्सीने गृह मंत्रालयाला सांगितले की, एअरफोर्स स्टेशनच्या काही गेट्‍सवर सिक्युरिटी नसल्या सारखीच होती. गेटच्या चारही बाजुला गवत वाढले होते.
- एअरबेजच्या आजुबाजुला गुजर समाजाचे लोक राहातात. दूध विक्री हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. सिक्युरिटी गार्ड्सला 20 रुपये देऊन हे लोक गाय- म्हशींना चारण्यासाठी एअरबेसच्या आत घेऊन जात होते. या दरम्यान हे लोक कॅंटीनमधून साहित्यही खरेदी करत होते.

अखेर पंजाब सरकारला आली जाग
- पठानकोट एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंजाब सरकार खळबडून जागे झाले आहे. सरकारने एअरबेसच्या आजुबाजुला राहाणार्‍या गुजर समाजाच्या नागरिकांची संख्या मोजत आहे. एअरबेस परिसरात कँटीनशिवाय अनेक दुकाने आहेत.
- येथे राहाणाण्‍या बहुतेकांकडे ओळख पत्र आहे. मात्र, काही लोक सिक्युरिटी गार्डला रुपये देऊन आत प्रवेश करतात.

हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी शेडमध्या काढली रात्र...
- इंग्रजी वृत्तपत्र ‘इंडियन एक्सप्रेस’ने एनआयएच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले की, दहशतवाद्यांनी हल्ला करण्‍यापूर्वी एअरबेसच्या मिलिट्री इंजीनियरिंग सर्व्हिसच्या रिकाम्या पडलेल्या शेडमध्ये रात्र घालवली होती.
- दहशतवाद्यांनी येथे जेवण केले होते. फर्नीचर बाजूला करून ते रात्री झोपले होते.

थोडक्यात बचावला एनआयएचा अधिकारी
- एअरबेसची तपासणी करताना एनआयए एक अधिकारी थोडक्यात बचावला होता. दहशतवाद्यांनी शेडमध्ये जिवंत बॉम्ब ठेवला होता.
- सोमवारी तपासणी करत असताना अधिकार्‍याचा पाय बॉम्बवर पडणार होता. तितक्यात त्याच्या सहकार्‍याने त्याला मागे ओढले. बॉम्बची पिन काढलेली आहे. तो गवतात लपवून ठेवला होता.

जुलैमध्ये शिजला होता हल्ल्याचा कट
- एका मीडिया रिपोर्टनुसार, इंटेलिजन्स ब्यूरो व पंजाब पोलिसांनी खुलासा केला आहे की, दहशतवाद्यांनी पठानकोट एअरबेसवर हल्ल्याचा कट जुलै 2015 मध्येच रचला होता.
- जुलैदरम्यान ऊन जास्त असते. त्यामुळे अंधारही उशीरा होता. शस्त्रास्त्रांसह एअरबेसमध्ये प्रवेश करणे सोयीचे नसल्याचा अंदाज दहशतवाद्यांनी घेतला होता.