आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार लाखांची लाच घेताना महिला न्यायाधीशाला अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चार लाखांची लाच घेतल्याच्या आरोपावरून तीस हजारी न्यायालयातील महिला न्यायाधीश रचना तिवारी लखनपाल यांना अटक करण्यात आली. विशेष न्यायालयाने त्यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणात त्यांचा वकील पती तसेच एका स्थानिक आयुक्तालाही अटक झाली असून त्यांची दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे.
रचना तिवारी लखनपाल यांना गुरुवारी विशेष न्यायाधीश संजीव अगरवाल यांच्यासमोर हजर करण्यात आले. चौकशीसाठी कोठडीची गरज नाही, असे सीबीआयने सांगितल्यानंतर त्यांना १३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीसाठी ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, रचना यांचे पती अॅड. आलोक लखनपाल आणि स्थानिक आयुक्त विकास मेहल यांनाही दोन दिवसांची कोठडी देण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...