आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळाः माजी एअरफोर्च चीफ त्यागी समवेत ३ जणांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ऑगस्टा व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यात सीबीआयने शुक्रवारी माजी एअरफोर्स चीफ एसपी त्यागी समवेत तीन जणांना अटक केली. सीबीआयने सांगितले की, त्यागी आणि त्यांचे वकील गौतम खेतान, भाऊ संजीव त्यागी उर्फ ज्युली यांनी एकतर पैसे घेतले आहेत नाहीतर दुसऱ्यांना बेकायदेशीरपणे व्यवहार करण्यासाठी प्रलोभन दाखवले आहे. त्यागी यांची यापूर्वीही चौकशी करण्यात आली आहे. मात्र तपासात सहकार्य न केल्यामुळे या तीघांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने अनेक देशांना पत्र लिहून या घोटाळ्यासंबंधी पुरावे मागितले आहेत. त्यागी २००५ ते ३१ मार्च २००७ पर्यंत एअरफोर्स चीफ होते. काय आहे प्रकरण...

- यूपीए-1 सरकारच्या कार्यकाळात ऑगस्टा वेस्टलँडचे व्हीव्हीआयपींसाठी 12 हेलिकॉप्टर्स विकत घेण्याचा व्यवहार झाला. या व्यवहारांतर्गत मिळालेले तीन्ही हेलिकॉप्टर अजूनही दिल्लीच्या पालम एअरबेसवर उभे आहेत.
- व्यवहार 3,600 कोटींचा होता. या संपूर्ण व्यवहारातील १० टक्के रक्कम लाच देण्याबद्दलची बातमी समोर आली. त्यानंतर युपीए सरकारने फेब्रूवारी २०१३ मध्ये हा व्यवहार रद्द केला.
- तेव्हा एअरफोर्स चीफ असलेले एसपी त्यागी समवेत 13 जणांवर खटला दाखल करण्यात आला.

काँग्रेसवर का प्रश्नचिन्ह उपस्थित झाले?
- ज्या बैठकीत हेलिकॉप्टरची किंमत ठरवण्यात आली, त्यामध्ये यूपीए सरकारचे काही मंत्री उपस्थिती होते. यामुळे काँग्रेसवरही प्रश्न चीन्ह उपस्थित झाले होते.
- इटलीच्या मिलान कोर्ट ऑफ अपिल्सने त्यांच्या निर्णयात या हेलिकॉप्टर व्यवहारात भ्रष्टाचार झाला असून यामध्ये एअरफोर्सचे माजी चीफ एसपी त्यागी सहभागी असल्याचे मान्य केले होते.
- कोर्टाने व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर बनवणारी कंपनी ऑगस्टा वेस्टलँडचे चीफ जी. ओरसी यांना दोशी ठरवले. त्यांना साडे चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.
- कोर्टाच्या निर्णयात चारवेळा सोनिया गांधी आणि दोन वेळा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा उल्लेख आहे. यामुळे भाजपने काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते.
- या प्रकरणात एका मध्यस्थानेसुध्दा खुलासा केला होता.

त्यागी यांच्यावर काय आरोप आहेत?
- माजी एअरफोर्स चीफने हेलिकॉप्टरांच्या जास्तीत जास्त उड्डाणाची उंची 6,000 मीटरवरून कमी करत 4,500 मीटर करण्याची परवानगी दिली
- 8 एप्रिलला इटलीच्या मिलान कोर्टाने 225 पानांचा निर्णय दिला होता. यामध्ये 17 पानांमध्ये त्यागी यांच्या भूमिकेबद्दल माहिती दिली आहे.
- निर्णयात असे सांगण्यात आले आहे की, त्यागींनी ऑगस्टा वेस्टलँडला हेलिकॉप्टर कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्यास मदत केली. 3565 हजार कोटींच्या या व्यवहारात भारती अधिकाऱ्यांना 90 ते 225 कोटी रुपये लाच देण्यात आली.
- मिलान कोर्ट ऑफ अपील्सने सांगितले होते की, त्यागी यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना लाचेची रक्कम पोहोचवण्यात आली. त्यावेळी त्यागी मिलान कोर्टासमक्ष हजर झाले नव्हते.
बातम्या आणखी आहेत...