आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मंत्री जयंती नटराजन यांच्या घरी सीबीआय छापे, पदाचा गैरवापर केल्याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूपीए-2 सरकारच्या जुले 2011 ते डिसेंबर 2013 दरम्यान नटराजन पर्यावरण मंत्री होत्या. - Divya Marathi
यूपीए-2 सरकारच्या जुले 2011 ते डिसेंबर 2013 दरम्यान नटराजन पर्यावरण मंत्री होत्या.
चेन्नई- खाणकामासाठी वन जमिनीच्या डायव्हर्जनची परवानगी देण्याच्या प्रकरणात सीबीआयने यूपीए सरकारमध्ये पर्यावरणमंत्री राहिलेल्या जयंती नटराजन यांच्या चेन्नईतील घरासह अनेक ठिकाणी शनिवारी धाडी घातल्या. तपास संस्थेने नटराजन यांच्यासह इलेक्ट्रोसील कास्टिंग लिमिटेडचे एमडी उमंग केजरीवाल, कंपनी इतर अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केल्यानंतर कारवाई केली आहे. चेन्नईसह त्यांच्या दिल्ली इतर शहरांतील ठिकाणांवर छापे मारण्यात आले. 

सीबीआयनुसार, हे प्रकरण वन संरक्षण कायद्याचे उल्लंघन करून झारखंडच्या सिंहभूम जिल्ह्यातील सारडा जंगलातील ५५.७९ हेक्टर जमिनीचे डायव्हर्जन करून खाण कंपनी इलेक्ट्रोसीलला दिल्याचे आहे. नटराजन यांच्याआधीचे पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी परवानगी देण्यास नकार दिला होता. मात्र, मंत्री झाल्यानंतर नटराजन यांनी त्याला परवानगी दिली. एफआयआरमधील आरोपांनुसार ही मंजुरी सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या अगदी उलट आहे. 
 
कोणते आरोप 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, जयंती नटराजन मंत्री असताना त्यांनी नियम डावलून पर्यावरण मंजूरी दिली होती. सीबीआयला याच्या तीन तक्रारी मिळाल्या होत्या. त्याचा तपास सीबीआय करत आहे. 
- यूपीए-2 सरकारच्या जुले 2011 ते डिसेंबर 2013 दरम्यान नटराजन पर्यावरण मंत्री होत्या. 30 वर्षांपासून त्या काँग्रेसमध्ये होत्या. 2015 मध्ये त्यांनी काँग्रस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. 
बातम्या आणखी आहेत...