आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBI Close Uncounting Money Case Against Mayawati

सीबीआय मायावतींचा बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाचा खटला करणार बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) बसपा प्रमुख मायावती यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाचा खटला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयावरील कायदेशीर मतांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.
मायावती यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयाने गेल्यावर्षी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका रद्दबातल ठरवण्यात आली. मात्र, या प्रकरणात मायावतींच्या मध्यस्थाने अर्ज दाखल केल्यामुळे प्रकरण प्रलंबित राहिले. सर्वोच्च न्यायालयाने 8 ऑगस्ट रोजी संबंधित व्यक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर मायावती यांचा खटला बंद करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

न्यायालयाच्या आदेशाची प्रत उपलब्ध झाल्यानंतर सीबीआयने आदेशावर कायदेशीर मत मागितले. कायदेशीर तज्ज्ञांनी खटला बंद करण्याचा सल्ला दिला. ज्या व्यक्तींना चौकशी हवी आहे, त्यांनी संबंधित न्यायालयात अर्ज करावा. यानंतर सीबीआय कायदेशीर बाबींचे पालन करेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशचा रहिवासी कमलेश वर्मा बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातला मध्यस्थ असून त्याने खटला रद्द करण्याची मागणी केली होती. ताज कॉरिडॉर प्रकरणातील आदेशाचा सीबीआयने योग्य अन्वयार्थ न लावल्यामुळे बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातील एफआयआर रद्द केल्याचे न्यायालयाने 1 मे रोजीच्या निकालात म्हटले होते. असे असले तरी सीबीआय मायावती यांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या अन्य प्रकरणांची चौकशी करू शकते, असे स्पष्ट करण्यात आले.


स्मार्ट क्लासरूमसाठी जयललितांकडून 17 कोटी निधी मंजूर
मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शाळेतील गळती रोखण्याचा भाग म्हणून तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी स्मार्ट क्लासरूमसाठी 17.06 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या पैशातून आदिवासी भागातील शाळांसाठी ‘ग्राफिकल मॅप्स’ सामग्री खरेदी करण्यात येणार आहे.