आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिस्ता सेटलवाडच्या कोठडीची मागणी, परदेशी निधीचा दुरुपयागाचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- परदेशी निधी स्वीकारण्यासंबंधीच्या कायद्याचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात सीबीआयने तिस्ता सेटलवाड आणि त्यांचे पतीच्या कोठडीची शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात मागणी केली. परदेशी निधीचा दुरुपयोग करणे आणि नियमांकडे दुर्लक्ष करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तिस्ता यांच्या वागण्यामुळे सांप्रदायिक सद्भावाला धोका होऊ शकतो, असे सीबीआयने म्हटले होते.

तिस्ता आणि त्यांचे पती जावेद आनंद यांना मुंबई उच्च न्यायालयाने ११ ऑगस्ट रोजी अंतरिम जामीन मंजूर केला होता. सीबीआयने त्यास आव्हान दिले आहे. तिस्ता आणि त्यांचे पतीची कंपनी सबरंग कम्युनिकेशन अँड पब्लिशिंगने अमेरिकेच्या फोर्ड फाउंडेशनकडून १.८ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय प्राप्त केला होता. वास्तविक तिस्ता आणि त्यांच्या पतीच्या म्हणण्यानुसार त्यांनी गुजरात दंगल पीडितांचा मुद्दा उपस्थित केला होता.
गृह मंत्रालयाकडून धमक्या : ग्रीनपीस
ग्रीनपीसने गृह मंत्रालयावर धमकावण्याचा आरोप केला आहे. एनजीआेवर दबाव टाकण्याची मोहीम गृहखाते राबवत आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी या प्रकरणी लक्ष घालावे, अशी विनंती संस्थेच्या वतीने नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या कारवाईमुळे देशाची लोकशाहीवादी अशी प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन होते, असे भारत आणि अमेरिकेतील ग्रीनपीस संघटनांच्या वतीने संयुक्त स्वरूपात देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. ही संस्था वातावरण बदल, ऊर्जा क्षेत्रात कार्य करते.