आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBI Director Sparks Controversy With Statement Over Rape

बलात्कार रोखता येत नसेल, तर त्याचा आनंद घ्या, \"सीबीआय\" महासंचालक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- खेळात सट्टेबाजी रोखता येत नसले तर त्याला कायदेशीर करून त्याचा आनंद लुटायला हवा, असे सांगताना केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) महासंचालक रणजित सिन्हा यांनी अगदी खळबळजनक उदाहरण दिले. बलात्कार रोखता येत नसेल, तर त्याचाही आनंद घ्या, असे त्यांनी सांगितले आहे.
"सीबआय"च्या वतीने विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सट्टेबाजीवर आपले मत मांडताना रणजित सिन्हा असे बरळले आहेत. एका प्रश्नाला उत्तर देताना रणजित सिन्हा म्हणाले, की जर आपल्याकडे राज्यांमध्ये लॉटरी दिसून येते, जर आपल्याकडे हॉलिडे रिसॉर्टवर कॅसिनो दिसून येतात, जर आपल्याकडे काळा पैसा जाहीर करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना जाहीर करते तर खेळामधील सट्ट्याला कायदेशीर का केले जाऊ नये? याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी काही संस्थांना तसे अधिकार दिले जाऊ शकतात.
रणजित सिन्हा म्हणाले, की खेळातील सट्टेबाजी जर रोखता येत नसेल तर त्याला कायदेशीर करणे योग्य राहील. जर बलात्कार रोखता येत नसेल तर त्याचा आनंद लुटलेला चांगला.
दरम्यान, रणजित सिन्हा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यावर स्पष्टीकरण देताना सीबीआयचा प्रवक्ता म्हणाला, की त्यांनी ज्या संदर्भात हे वक्तव्य केले आहे ते समजून घेणे आवश्यक आहे. वक्तव्याचा सारासार विचार केल्यास ते आक्षेपार्ह वाटू शकते.
खेळातील बेटींवर काय म्हणाला राहुल गांधी, वाचा पुढील स्लाईडवर