आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलगेट : रंजित सिन्हा यांची आरोपींशी भेट चुकीची : सुप्रीम कोर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कोलगेट आणि जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यातील आरोपींशी सीबीआयचे माजी संचालक रंजित सिन्हा यांनी घेतलेली भेट चुकीची होती. त्यामुळे प्रकरणाचा तपास केला जावा, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले आहे. त्यासाठी केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) तपासात सहकार्य करावे, असे कोर्टाने सांगितले.

न्यायमूर्ती मदन बी. लोकूर यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाच्या म्हणण्यानुसार आरोपांमध्ये तथ्य वाटू लागले आहे. तपास अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत सिन्हा यांनी आरोपींची भेट घेतली होती. सीव्हीसीने संपूर्ण प्रकरणाचा तपास जुलैपर्यंत करावा आणि त्याचा अहवाल दाखल करावा. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ आणि न्यायमूर्ती ए. के. सिकरी यांचाही न्यायपीठात समावेश आहे. दुसरीकडे न्यायपीठाने सिन्हा यांची याचिका रद्दबातल केली आहे. कथित खोट्या साक्षीबद्दल वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्या विरोधात खटला चालवण्याची मागणी सिन्हा यांनी केली होती. भूषण यांनी एनजीआे कॉमन कॉजच्या वतीने खाणपट्टे वाटप घोटाळ्याच्या तपासात प्रभाव टाकण्यासाठी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करण्यात आला होता. सिन्हा यांच्याविरोधात कोर्टाच्या निगराणीमध्ये विशेष पथकामार्फत तपास केला जावा, अशी मागणी भूषण यांनी याचिकेतून केली होती.
बातम्या आणखी आहेत...