आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत केटरींगची कंत्राटे मिळवून 10 वर्षात उभारला 500 कोटींचा इमला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रेल्वेतील पाणी आणि केंटरिंग घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने श्याम बिहारी अग्रवाल या कंत्राटदारासह चार कंपन्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. रेल्वेच्या बहुतांश केटरींग कंत्राटांवर अग्रवाल यांचे वर्चस्व असल्याचे सीबीआयला समजले आहे. अवघ्या 10 वर्षांत 500 कोटींचा व्यवसाय अग्रवाल यांनी उभारला आहे.

अग्रवाल यांच्या दक्षिण दिल्लीमधील न्यू फ्रेंड्स कॉलनी या घरावर सीबीआयने शुक्रवारी छापा मारला. त्यात 27 कोटी रुपयांचा रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. अग्रवाल यांच्याकडे भारतीय रेल्वेतील पँट्री कारपैकी सुमारे 70 टक्के व्यवसाय आहे. ते आर के असोसिएट्स या त्यांच्या मुख्य कंपनीसह इतर कंपन्यांच्या माध्यमातून हा व्यवसाय चालवतात.

सीबीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजधानी एक्सप्रेश, शताब्दी एक्सप्रेससह सर्व महत्त्वाच्या अशा रेल्वेंची कंत्राटे अग्रवाल यांच्या कंपनीला देण्यात आलेली आहेत. रेल्वेत सुरुवातीला काही नेत्यांच्या ओळखीच्या माध्यमातून अग्रवाल यांनी छोटी कंत्राटे मिळवली. त्यानंतर हळू हळू या व्यवसायाचा विस्तार केल्याचे सुत्रांनी सांगितले.

अग्रवाल यांच्या आर के असोसिएट्स अँड हॉटेलियर्स प्रायव्हेट लि. या कंपनीच्या वेबसाईटवरही त्यांच्या कंपनीच्या या कामाबाबत माहिती देण्यात आली आहे. सुमारे 150 रेल्वेमध्ये सुविधा पुरवत असल्याचे या वेबसाईटवर सांगण्यात आलेले आहे. अग्रवाल यांच्या अनेक वेगवेगळ्या कंपन्या असून सीबीआयच्या एफआयआरमध्ये त्यापैकी चार कंपन्यांची नावे आहेत.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वेत जेव्हा अशा प्रकारचे एखादे कंत्राट निघते त्यावेळी अग्रवाल नव्या डायरेक्टर्ससह एक नवी कंपन सुरू करतात. त्यांच्या ओळखीमुळे या कंपनीला कंत्राटही मिळतात. सीबीआय आणि प्राप्तीकर विभाग त्यांच्या घरातून मिळालेल्या रोख 27 लाख रुपयांची चौकशी करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सीबीआयच्या एफआयआरमध्ये आर के असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड, सत्यम केटरर्स प्रा.लि., अंबुज हॉटेल अँड रिअल इस्टेट, पीके असोसिएट्स प्रा. लि., सनशाइन प्रा.लि., वृंदावन फूड प्रोडक्टस आणि फूड वर्ड यासह रेल्वेच्या दोन अधिकाऱ्यांची नावेही आहेत. यामध्ये उत्तर रेल्वेचे माजी मुख्य वाणिज्य व्यवस्थापक एम एस छलिया आणि संदीप सिलास यांच्या नावांचा त्यात समावेश आहे. सिलाह हे 1983 च्या बॅचचे आहेत. पूर्वी ते माजी मंत्री ऑस्कर फर्नांडीस आणि अंबिका सोनी यांचे खासगी सचिव होते. अग्रवाल यांची मुले राहुल आणि अभिषेक हे देखिल कंपन्यांचे डायरेक्टर आहेत, त्यांचीदेखिल चौकशी करण्यात येत आहे.