आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलगेट प्रकरणी विजय दर्डा यांच्यासह इतरांवर आरोपपत्र दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि इतरांवर आज (गुरुवार) आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी दाखल करण्यात आलेले हे दुसरे आरोपपत्र आहे.
यापूर्वी कोलगेट प्रकरणी विजय दर्डा आणि इतरांची सीबीआयने चौकशी केली होती. आता दिल्ली न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सीबीआयने दहापेक्षा जास्त गुन्हे दाखल केले आहेत. जेएलडी यवतमाळ एनर्जी लिमिटेडचे विजय दर्डा संचालक होते.