आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापमं घोटाळ्याच्या तपासासाठी सीबीआयचे 40 अधिकाऱ्यांचे पथक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सीबीआयने मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्याच्या चौकशीसाठी संयुक्त संचालक स्तरावरील अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी तयार केली आहे. तब्बल ४० अधिकाऱ्यांचे हे पथक सोमवारी भोपाळला पोहोचेल. त्याचे नेतृत्व आयपीएस अरुणकुमार शर्मा यांच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. शर्मा हे गुजरात केडरचे अधिकारी आहेत. सीबीआय या प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि वकील विवेक तनखा यांच्याकडे विचारणा करू शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे पथक सोमवारी चौकशीची सूत्रे आपल्या हातात घेण्याची औपचारिकता पूर्ण करणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.