नवी दिल्ली - केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) नवनियुक्त संचालक अनिलकुमार सिन्हा यांना टूजी घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.
रंजित सिन्हा यांच्या निवृत्तीनंतर मागच्या तीन आठवड्यांपासून टूजी चौकशीत सीबीआय संचालकाच्या नेमणुकीच्या मुद्द्यावर मोठी चर्चा सुरू होती. मात्र, अनिलकुमार सिन्हा यांना आता परवानगी मिळाल्याने या चौकशी प्रक्रियेला वेग येऊ शकतो. माजी संचालक रंजित सिन्हा यांनी निवृत्तीपूर्वी स्वत:ला टूजी चौकशीपासून दूर ठेवले होते. नव्या संचालकावर चौकशीची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी वकील के. के. वेणुगोपाल यांनी एका याचिकेद्वारे केली होती. सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने याप्रकरणाची सुनावणी केली.