आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CBI मधील ढवळाढवळ रोखण्‍यासाठी 10 जुलैपर्यंत कायदा कराः सुप्रीम कोर्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- सीबीआयच्‍या कामात सरकारच्‍या हस्‍तक्षेपावर सर्वोच्‍च न्‍यायालयाने चिंता व्‍यक्त केली आहे. सीबीआय स्‍वायत्त नसून मालकाच्‍या इशा-याप्रमाणे बोलणा-या पोपटासारखी सीबीआयची अवस्‍था झाली आहे. सीबीआयला स्‍वतंत्र करणे आवश्‍यक आहे, असे निरिक्षण सर्वोच्‍च न्‍यायालयाने नोंदविले आहे. न्‍यायालयाने सीबीआय आणि सरकारलाही आज कडक शब्‍दांमध्‍ये फटकारले.

सीबीआयच्‍या कामकाजामध्‍ये हस्‍तक्षेप रोखण्‍यासाठी 10 जुलैपर्यंत कायदा करण्‍याचे निर्देश सर्वोच्‍च न्‍यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. तसेच सीबीआयने कोणताही अहवाल 33 सदस्‍यीय प‍थक तसेच संचालाकांव्‍यतिरिक्त कोणालाही दाखवू नये, असे स्‍पष्‍ट आदेश न्‍यायालयाने दिले आहेत. तसेच कोळसा घोटाळृयाची चौकशी करणा-या कोणताही अधिकारी तसेच वकीलांना मंत्र्यांच्‍या संपर्कापासून दूर ठेवा, असेही स्‍पष्‍ट निर्देश न्‍यायालयाने दिले आहे. तसेच कायदा मंत्री इतर मंत्रालयाशी संबंधीत चौकशीचा अहवाल मागवू शकतात का, अशी विचारणाही न्‍यायालयाने केली आहे. चौकशी अहवाल विशेष सीबीआय न्‍यायालयातही सादर करण्‍यात येऊ नये, असे आदेशही सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिले आहेत.

तर सीबीआयच्‍या अधिका-यांची बैठक कायदा मंत्र्यांनी बोलाविली होती, असे ऍटर्नी जनरल गुलाम वाहनवटी यांनी न्‍यायालयात सांगितले आहे. त्‍यामुळे कायदा मंत्री अश्विनीकुमार आणखी अडचणीत सापडले आहेत. दरम्‍यान, सर्वोच्‍च न्‍यायालयाने फटकारल्‍यानंतर अश्विनीकुमार आणि वाहनवटी यांनी तत्‍काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजप नेत्‍या आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेत्‍या सुषमा स्‍वराज यांनी केली आहे.

कोळसा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयतर्फे सादर करण्‍यात आलेल्‍या शपथपत्रावर न्‍यायालयात सुनावणी झाली. त्‍यावेळी न्‍यायालयाने सरकारवर कठोर शब्‍दांमध्‍ये ताशेरे ओढले. न्‍यायालयाने म्‍हटले की, सीबीआयची अवस्‍था बंदिस्‍त पोपटासारखी झाली आहे. मालक जे सांगतात, ते हा पोपट बोलतो. दुर्दैवाने या पोपटाचे अनेक मालक आहेत, अशी टीका न्‍यायालयाने केली. सीबीआयने पंतप्रधान कार्यालय तसेच कोळसा मंत्रालयाच्‍या सहसचिवांना सीबीआयच्‍या अधिका-यांची भेट घेतल्‍यावरुन चांगलेच फटकारले.

सर्वोच्‍च न्‍यायालयाने सरकारला फटकारल्‍यानंतर ऍटर्नी जनरल गुलाम वाहनवटी यांनी हात झटकले आहेत. त्‍यांनी न्‍यायालयाला सांगितले की, सीबीआयच्‍या अधिका-यांची बैठक मी बोलाविली नव्‍हती. मी स्‍टेटस रिपोर्ट पाहिलेला नाही. बैठक कायदा मंत्र्यांनी बोलाविली होती.

पुढील स्‍लाईडमध्‍ये वाचा सर्वोच्‍च न्‍यायालयाने काय सुनावले सीबीआयला...