आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळसा घोटाळ्यात मनमोहन यांची सीबीआयने केली चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सीबीआयने कोळसा घोटाळ्यात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची चौकशी केली. कुमारमंगलमल बिर्लांच्या हिंदाल्को कंपनीला देण्यात आलेल्या तालाबीरा खाणीशी संबंधित प्रकरणात सीबीआय अधिका-यांच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी डॉ. सिंग यांच्या निवासस्थानी चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सीबीआयला २७ जानेवारीला विशेष न्यायालयात स्टेटस रिपोर्ट दाखल करायचा आहे.
तत्कालीन कोळसा मंत्र्यांची चौकशी आवश्यक असल्याचे १६ डिसेंबर रोजी विशेष न्यायालयाने म्हटले होते. त्या वेळी डॉ. सिंग यांच्याकडेच कोळसा मंत्रालयाचाही प्रभार होता. सीबीआयचे प्रवक्ते कांचन प्रसाद यांनी या वृत्ताचा इन्कार केला नाही आणि दुजोराही दिला नाही. सीबीआयला हिंदाल्कोच्या प्रकरणाची फाइल बंद करायची होती. मात्र १६ डिसेंबर रोजी न्यायालयाने सीबीआयची विनंती धुडकावली होती.