आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टूजी प्रकरणाचे सीबीआय तपास अधिकारी संतोष रस्तोगी यांना हटवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सीबीआय अधिकारी संतोष रस्तोगी यांना टूजी घोटाळ्याच्या तपासातून बाहेर काढण्यात आल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतला आहे. ही गंभीर बाब असून चूक झाली असल्यास ती सुधारण्यात यावी, असे कोर्टाने बजावले आहे.
रस्तोगी डीआयजी श्रेणीचे अधिकारी आहेत. ते टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या चौकशीवर निगराणी करण्याचे काम करत आहेत. त्यांची गुन्हे शाखेत बदली होण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती एच.एल. दत्तू यांच्या अध्यक्षतेखाली पीठासमोर मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या एनजीओने हे प्रकरण न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. एनजीओचे वकील प्रशांत भूषण म्हणाले, सरकारी वकील यूयू ललित यांनी सीबीआयला पत्र लिहिले होते. त्यात रस्तोगी यांच्या बदलीला विरोध करण्यात आला होता. त्यावर कोर्टाने सीबीआयचे वकील के. के. वेणुगोपाल यांना दस्तऐवजाची सत्यता पडताळणी करण्यात यावी, असे निर्देश दिले. प्रकरणाची पुढील सुनावणी 2 सप्टेंबर रोजी होणार आहे.