आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBI Presenting FIR In The Case Of Coal Allocation Scam

कोळसा घोटाळा प्रकरणी सीबीआय सादर करणार प्राथमिक चौकशी अहवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सीबीआय कोळसा खाणपट्टे वाटपातील गहाळ 15 फायलींचा प्राथमिक चौकशी अहवाल दोन दिवसांत सादर करणार आहे. कोळसा मंत्रालय अधिका-यांसोबतच्या बैठकीनंतर गुरुवारी हा निर्णय घेण्यात आला.
कोळसा मंत्रालयाने बुधवारी सीबीआयला उपलब्ध फायलींबाबत विस्तृत माहिती दिली व त्यास तक्रार म्हणून गृहीत धरण्याची विनंती केल्याचे सूत्रांनी सांगितले. सीबीआय पथक व कोळसा मंत्रालयातील अधिका-यांची 15-18 फायलींसंदर्भात चर्चा झाली. छाननी समितीच्या अहवालाची फाइल अद्याप सापडली नाही. कागदपत्रांची छाननी व कोळसा मंत्रालयाच्या अधिका-यांशी झालेल्या चर्चेत महत्त्वाच्या फायली गहाळ असल्याचे सीबीआयच्या निदर्शनास आले. गहाळ फायली 26 व्या छाननी समितीशी संबंधित आहेत. यात खाणपट्टे वाटपासंबंधित शेरे होते असे सांगितले जाते. कोळसा मंत्रालय ही फाइल देऊ शकले नाही. त्याऐवजी त्यांनी मंजुरीशी संबंधित कच्ची फाइल जमा केली. कोळसा मंत्रालयाने सोमवारी कागदपत्रांसोबत फायलींची यादी सुपूर्द केली.