आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगल विरोधात CBI चौकशी; परवानगीशिवाय घेतली अत्यंत संवेदनशील ठिकाणांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - गुगल मॅप्स

नवी दिल्‍ली:
केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने जगातील पहिल्या क्रमांकाचे सर्च इंजिन असलेल्या गुगल विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार गुगलने आयोजित केलेला कार्यक्रम Mapathon 2013 या संदर्भातील आहे. या तक्रारीत कंपनीने काही अत्यंत सुरक्षित आणि संवेदनशिल ठिकाणांची माहिती नकाशांमध्ये दाखवून कायद्याचे उल्लंघन केल्याचे नमुद करण्यात आले आहे. काही माध्यमांच्या अहवालानुसार सीबीआयने गुगलच्या भारतातील कार्यालयांमधील मोठ्या अधिकार्‍यांशी या संदर्भात चौकशी केली आहे. या प्रकरणी प्राथमिक तपास दिल्ली पोलिसांनी केला, मात्र नंतर हे प्रकरण सीबीआयला सोपोवण्यात आले.
काय आहे आरोप
सर्वेयर जनरल ऑफ इंडियातर्फे केंद्रीय गृहमंत्रालयात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने प्राथमिक तपास सुरू केला आहे. या तक्रारीत फेब्रूवारी आणि मार्चमध्ये आयोजित केलेल्या Mapthon 2013 या कार्यक्रमात गुगलने काही अशा ठिकाणांचा नकाशा बनवण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यांना भारतीय नकाशावर दाखवण्यात आलेले नाही. तक्रारीनुसार, भारताच्या अधिकृच मॅपिंग सर्वेयर जनरल ऑफ इंडियाकडून गुगलने आपल्या नकाशांसाठी परवानगी घेतली नाही. याशिवाय, यानकाशांमध्ये देशातील अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची सुरक्षा असलेल्या ठिकाणांची माहिती देण्यात आली आहे.

काय होता हा कार्यक्रम
गुगलने नकाशा स्पर्धेचे आयोजन केले होते. ज्यामध्ये स्पर्धकांना आपल्या जवळपासच्या परिसरातील, विशेष करून दवाखाना, हॉटेल, रेस्टॉरंट इत्यादी ठिकाणांची माहिती टाकण्याचे आवाहन करण्यात आले होते. हजारो लोकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. या कार्यक्रमातून माहिती मिळाल्यानंतर सर्वेयर जनरल ऑफ इंडियाने गुगलला ही सर्व माहिती मागितली. मात्र गुगलने आपण संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधला असल्याचे सांगितले. तर आपण देशाच्या कायद्यांबद्दल सजग आहोत असे गुगलने सांगितले आहे.