आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBI Questions Virbhadra Singh In Graft Case News In Marathi

हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांची सीबीआय चौकशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून भ्रष्टाचाराच्या संशयावरून चौकशी सुरू करण्यात आली आहे. स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन (एसटीसी)ने केलेल्या तक्रारीची दखल घेत सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. मे 2009 ते जानेवारी 2011 दरम्यान वीरभद्र सिंह हे पोलाद मंत्री होते. मुंबई स्थित स्टील कंपनीशी झालेल्या व्यवहारात त्यांनी 2 कोटी 80 लाखांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान भाजप खासदार अरुण जेटली यांनी चौकशी करण्यासंबंधी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.

वीरभद्र सिंह यांच्या आयकर विवरणाची चौकशी केली असता, वर्ष 2009-10, 10-11 व 11-12 यात घोळ दिसून आला आहे. या तीन वर्षांत त्यांच्या कृषी व्यवसायातून आलेल्या उत्पन्नात 18 ते 30 पट वाढ झाल्याचे दिसून आले आहे.